Headlines

रविंद्र जडेजा CSK ची साथ सोडणार? ‘हे’ आहे कारण

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सध्या युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आल्याने जडेजा विश्रांती घेत आहे. त्यात गेल्या अनेक महिन्यापासून तो चेन्नई सुपरकिंग्जची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. आता पुन्हा एकदा अशीच चर्चा रंगत आहे. त्यामुळे नेमकं असं सीएसकेसोबत जडेजाच काय बिनसलंय ज्यामुळे ही चर्चा रंगतेय ते जाणून घेऊयात. 

आयपीएलचा यंदाचा हंगामा रवींद्र जडेजासाठी खूपच निराशाजनक ठरला होता. आयपीएलच्या 15व्या हंगामाच्या सुरुवातीला धोनीने कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने (CSK) जडेजाला कर्णधार बनवले होते. मात्र सतत पराभवाचा सामना करावा लागत असल्याने जडेजाने हंगामाच्या मध्यातच संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा धोनीने चेन्नईचे धुरा सांभाळली होती. या दरम्यान दुखापत झाल्याने रविंद्र जडेजा संघाबाहेर पडला होता. 

कर्णधार पदावरून पायउतार झाल्यानंतर रविंद्र जडेजा आणि चेन्नईमध्ये खुप मोठे वाद झाले होते. जडेजा आणि सीएसकेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना आधीच अनफॉलो केले होते. त्यानंतर जडेजाने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर सीएसकेशी संबंधित सर्व पोस्ट्स डीलीट केल्या होत्या. 

ट्विट डिलीट
यानंतर आता पुन्हा एकदा जडेजाने सीएसकेच्या पोस्टला दिलेले उत्तर हटवले आहे. खरं तर, सीएसकेने या वर्षी फेब्रुवारीमध्ये जडेजाला पिवळ्या जर्सीत दाखवत एक कोलाज शेअर केला होता आणि त्याला ’10 साल का सुपर जड्डू’ असे कॅप्शन दिले होते, जे सीएसकेसाठी त्याचे दशकभराचे आयपीएल दर्शवते. ट्विटला उत्तर देताना जडेजाने फक्त चार शब्दांत उत्तर दिले, ’10 वर्षे अजून’. मात्र जडेजाने ते उत्तर आता डिलीट केले आहे.

दरम्यान सतत सीएसके विरूद्ध रविंद्र जडेजा अशी भूमिका घेत असल्याने तो चेन्नईची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र सीएसकेसोडण्याबाबत तो लवकरच ठोस भूमिका घेण्याची चर्चा आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *