Headlines

‘रावण नाही हा तर औरंगजेब…’, सैफमुळे Adipurush सिनेमाला प्रदर्शनापूर्वी लागणार ग्रहण?

[ad_1]

Boycott Adipurush: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभास स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा तुफान चर्चेत आहे. सिनेमात प्रभास प्रभू राम यांची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकताच सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. अनेकांनी ‘आदिपुरुष’ सिनेमाचा टीझर पाहुन नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहे. सिनेमातील स्टार कास्ट आणि त्यांचे लुक्स पाहून सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. 

‘आदिपुरुष’ सिनेमाच्या टीझरवर टीका
‘आदिपुरुष’चा टीझर रिलीज होताच लाखो लोकांनी तो पाहिला आहे. एक मोठा वर्ग असा आहे की ज्यांना या सिनमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या पण कदाचित टीझरमुळे त्यांची निराशा झाली आहे. 

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोक सिनेमाच्या VFX आणि अॅनिमेशनवर टीका करत आहेत. सिनेमा नक्की कोणत्या दृष्टीने साकारण्यात आल्याचं कळत नाही. हा सिनेमा नाही तर, लहान मुलांचं कार्टुन असल्याचं अनेक जण आहेत. 

सैफ अली खानला म्हणत आहेत औरंगजेब
फक्त सिनेमाच्या VFX वर नाही तर, सिनेमातील स्टार कास्टवर देखील बोट ठेवण्यात येत आहे. प्रभू राम यांच्या भूमिकेसाठी प्रभास योग्य नाही, तर सीता यांच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री क्रिती सनॉन फेल ठरल्याची चर्चा आहे. 

महत्त्वाच म्हणजे प्रभास आणि क्रितीच्या तुलनेत अभिनेता सैफ अली खान त्याच्या लुकमुळे तुफान ट्रोल होत आहे. रावणाच्या भूमिकेत दिसणाऱ्या सैफवर चाहते बरसले आहेत. सैफला या व्यक्तिरेखेत पाहून लोक त्याला लंकेश नाही तर ‘औरंगजेब’ म्हणत आहेत. 

चर्चेत आहे ‘आदिपुरुष’
‘आदिपुरुष’ जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. सिनेमात रामाच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि लंकेश रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे. सिनेमा 12 जानेवारी 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण सध्या सिनेमाची होणारी टीका पाहाता ‘आदिपुरुष’ सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी जोर धरत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *