Headlines

Ration Card Online: थेट घरी येईल रेशन कार्ड ,असा करा ऑनलाईन अर्ज, प्रोसेस आहे खूप सोपी

[ad_1]

नवी दिल्ली: Process To Apply For Ration Card:रेशनकार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. ज्यामुळे तुम्ही अगदी स्वस्त दरात अन्नधान्य खरेदी करू शकता. तसेच, इतर अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या सुविधांचा लाभ घेता येणार नाही. रेशनकार्ड धारकांना घरातील प्रत्येक व्यक्तीनुसार ५ किलो गहू किंवा तांदूळ मिळतात. तुमच्याकडे रेशनकार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवून घ्यायचे असेल तर,आज आम्ही त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्हाला घरबसल्या बनवलेले रेशनकार्ड मिळेल. रेशन कार्डसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे आणि त्यासाठी प्रथम तुम्हाला संबधित अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल.

वाचा: हे स्वस्तात मस्त Audio Products दुप्पट करतील तुमचा म्युझिक एक्स्पीरियंस, पाहा फीचर्स-किंमत

पोर्टलला भेट देऊन, तुम्ही ऑनलाइन रेशन कार्डसाठी अर्ज करा वर क्लिक करा येथे तुम्ही तुमचा तपशील भरा. त्यानंतर सरकारी अधिकारी तुमची पात्रता तपासतील. जर तुम्ही दिलेली माहिती बरोबर असेल तर तुम्हाला रेशनकार्ड नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाते.

रेशन कर्डसाठी आवश्यक कागदपत्रे:

रेशन कार्डसाठी 3 पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्डची छायाप्रत, पॅन कार्डची छायाप्रत, चालक परवाना, मतदार ओळखपत्र, अर्जदाराच्या नावावर चालू टेलिफोन बिल, अर्जदाराच्या नावावर एलपीजी कार्ड, मनरेगा जॉब कार्डची छायाप्रत, सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे जारी केलेले ओळखपत्र इत्यादीची गरज भासते. आर्थिक निकषानुसार तीन वेगवेगळे रेशन कार्ड दिले जातात. वर्षाला १० हजारांच्या उत्पन्न असलेल्यांना बीपीएल (BPL- Below Poverty Line) कार्ड.

वाचा: Smartphone Offers : एकच नंबर ! ७ हजारात घरी आणा २७ हजार रुपये किमतीचा ‘हा’ शानदार 5G स्मार्टफोन, पाहा ऑफर

तर, १० हजारांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या APL (Above Poverty Line) कार्ड आणि निश्चित उत्पन्न नसलेल्यांना AAY कार्ड जारी केले जाते. वेगवेगळ्या सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी रेशन कार्ड महत्त्वाचे आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव असते. तुम्ही घरातील इतर सदस्यांच्या नावाचा देखील समावेश करू शकता.

वाचा: Common Mobile Charger: कॉमन चार्जरची मागणी वाढली, वेगवेगळ्या चार्जरमुळे हे होतेय नुकसान

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *