Headlines

रस्त्याचे अर्धवट काम केल्याने पिंपळवाडी ग्रामस्थ आक्रमक , प्रजासत्ताक दिनीच करणार रास्ता रोको आंदोलन,

बार्शी – तालुक्यातील पिंपळवाडी हे गाव बार्शी- येरमाळा या रोडवर असून पिंपळवाडी गावापासून येरमाळा हे अंतर ५ किलोमीटर आहे. एम एस आर डी सी ने व मेगा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रोडचे काम अर्धवट सोडल्याने पिंपळवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत ने त्यांना वेळोवेळी लेखी व तोंडी विनंती करूनही अर्धवट काम पूर्ण न केल्याने  गावातील ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

गावातील वेताळ मंदिर, एस.टी स्टॅन्ड, अन्नपूर्णा देवी मंदिराच्या पायऱ्या, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बायपास रोड आदी कामे अर्धवट अवस्थेत असून रोडचे नाली काम ही केलेले नाही. येत्या १५ दिवसांत अर्धवट  राहिलेली कामे पूर्ण न केल्यास २६ जानेवारी२०२२ रोजी पिंपळवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *