Rashmika Mandanna अभिनय सोडणार? अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ


मुंबई : साऊथची सुपरस्टार अभिनेत्री नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हिला कोण ओळखत नाही. आपल्या सौंदर्याने आणि एक्प्रेशनने सर्वांनाच वेड लागवणारी रश्मीका पुष्या सिनेमामुळे देखील चर्चेत आली. ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्लीची भूमिका साकारली होती. रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता पाहून तिला केवळ दक्षिणेतूनच नव्हे तर बॉलिवूडमधूनही ऑफर्स येत आहेत.

‘किरिक पार्टी’ या चित्रपटाद्वारे साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणारी रश्मिका मंदान्नाने आज चित्रपटसृष्टीत आपली एक जागा निर्मान केली आहे.

तिच्या प्रत्येक अभिनयावर आणि डायलॉगवर चाहते प्रेम करतात. रश्मिकाचा पहिलाच चित्रपट असा काही यशस्वी झाला की, तेव्हाच ती लोकांमध्ये पॉप्युलर झाली. परंतु तुम्हाला तिच्याबद्दल एक गोष्ट जाणून धक्का बसेल की, रश्मिका तिच्या या पहिल्या चित्रपटानंतरच अभिनयक्षेत्राला अलविदा करणार होती.

होय हे खरं आहे, रश्मिकाने एका मुलाखतीत या घटनेबाबत खुलासा केला आहे. रश्मिकाने सांगितले की, तिला फिल्मी जग सोडून वडिलांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

मुलाखतीदरम्यान, जेव्हा तिला विचारण्यात आले की, वयाच्या 19 व्या वर्षी काम सुरू करताना तुला कसे वाटते? या वयात बाकीच्या मुलींसारखं मोकळेपणाने फिरावंसं  तुला वाटलं नाही का?

या प्रश्नाला उत्तर देताना रश्मिकाने म्हणाली, “मला माझ्या आयुष्यात खूप मजा करायची होती. त्यावेळी मी केलेली मेहनत आज फळाला आली आहे. पण हे खरे आहे की, त्यावेळी मला वाटले होते की मी फक्त एकच चित्रपट करेन. तेव्हा माझे आई-वडीलही म्हणाले की एकच चित्रपट कर आणि मग परत ये. पण माझ्या नशिबात काही वेगळे लिहिले होते आणि लोकांच्या प्रेमाने मला अभिनयाच्या दुनियेत जिवंत ठेवले.”

रश्मिका मंदान्नाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दहशत निर्माण केल्यानंतर रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घालणार आहे.Source link

Leave a Reply