Headlines

रणवीरच्या न्यूड फोटोशूटपाठोपाठ आता ‘ही’ अभिनेत्रीही लावणार नंबर?

[ad_1]

Ranveer Singh Nude Photoshoot : रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटने संपुर्ण भारतात खळबळ माजवली होती. त्यावर अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी कमेंट्स केल्या तर दुसरीकडे रणवीरला फारच वाईट पद्धतीने ट्रोलही करण्यात आले. पण आता नुकत्याच एका अभिनेत्रीने रणवीरच्या या न्यूड फोटोशूटवर केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. तिच्यामते रणवीरने केलेलं हे फोटोशूट तिच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. तिलाही असं फोटोशूट करायचं आहे. 

ती अभिनेत्री आहे श्रीजीता डे. श्रीजीता डे ही एक हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. सध्या तिने ओटीटीवरील शोज करते आहे. नुकतीच तिची ‘नक्षलबारी’ ही वेबसिरिज प्रसिद्ध झाली होती. 

रणवीर सिंगच्या फोटोशूटबद्दल श्रीजीता डे म्हणाली, ”एखाद्या महिला सुपरस्टारने असे बोल्ड फोटोशूट केले असते तर लोकांच्या प्रतिक्रिया काय असत्या हे मी सांगू शकत नाही, परंतु मी हे सांगू शकते की हे करण्यासाठी खूप धैर्य लागते. त्याशिवाय एवढे मोठे धाडस करता येत नाही. असे फोटोशूट करणं हे सोप्पं नाही कारण त्यासाठी मानसिक तयारीसोबतच आपल्याला आपल्या शरीरालाही स्विकारणे आवश्यक असते. 

रणवीर सिंगच्या व्हायरल होत असलेल्या न्यूड फोटोंबद्दल श्रीजीता डे पुढे म्हणाली, ”एखादी व्यक्ती हे तेव्हाच करू शकते जेव्हा ती त्याच्या शरीरावर खूप प्रेम करत असेल. याच विचाराने आणि आत्मविश्वासाने जेव्हा रणवीर कोणत्याही भीतीशिवाय स्वतःला लोकांसमोर आणू शकतो तर तो जगात दुसरे कुठलेही कठीण काम सहज करू शकतो. 90 च्या दशकात शक्ती कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनीही हे केले होते. त्यातूनही अनेक इंडियन मॉडेल्सनी मोठ्या मॅगझिन्ससाठीही असे फोटोशूट केले आहे. पण आता रणवीरने फोटोशूट केलं आणि ते सोशल मीडियावर टाकलं तर त्यात बिघडलं कुठे?” 

आपल्या या वक्तव्यावर ठाम राहत श्रीजीता म्हणाली की, ”भविष्यात मलाही असे फोटोशूट करायला आवडेल. न्यूड फोटोशूट केले म्हणून कोणीतरी त्याच्यावर गुन्हा दाखल करत तेव्हा अशावेळी मला या गोष्टीचे विशेष काही अप्रुप वाटले नाही वा आश्चर्य वाटले नाही. हे वर्ष 2022 चे आहे. आपण आता खूप मोठे गेलेलो आहोत तेव्हा तुम्ही एखाद्या कामात किती कम्फर्टेबल असता आणि असं काही धाडस करण्यासाठी तुमच्यात किती हिम्मत आहे हे आज म्हत्त्वाचे ठरते”, असे परखड मतं तिने व्यक्त केले. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *