Headlines

रणवीर सिंगनंतर अनन्या पांडेला ‘या’ अभिनेत्याला पाहायचंय न्यूड

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनन्याने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवकोंडासोबत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली होती. या आधी अनन्या मागच्या काही काळापासून तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहे. करण जोहरच्या शोमध्ये अनन्यानं तिच्या डेटिंग लाइफबद्दल बिनधास्त गप्पा मारल्या आणि त्यासोबत तिनं विजय देवरकोंडाला न्यूड पाहण्याची इच्छा व्यक्त केली. 
 
रॅपिड फायर राउंडमध्ये विजय आणि अनन्याला बरेच मजेदार प्रश्न करणनं विचारले. करणनं विजयला रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरून एक प्रश्न विचारला, विजय देवरकोंडा आंतरराष्ट्रीय मासिकासाठी न्यूड पोज देणार का? यावर उत्तर देताना विजय म्हणाला, जर ते चांगलं शूट असेल तर मला त्यात काही अडचण नाही. आता विजय न्यूड फोटोशूट करतो की नाही हे येणारा काळच सांगेल. कारण सध्या रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरून चांगलाच गदारोळ झाला आहे. रणवीर सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंगच्या समर्थनात अनेक सेलिब्रिटीही आले आहेत. रणवीरकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अनन्याला कोणाला न्यूड पाहायचे आहे? 

कॉफी विथ करण 7’मध्ये विजय देवरकोंडाला न्यूड पाहण्याची इच्छा व्यक्त केली. अनन्याने सांगितले की, विजयला न्यूड पाहण्यात तिला कोणतीही अडचण येणार नाही. तिने ‘लायगर’ या चित्रपटाच्या पोस्टवरमध्ये विजयला थोडेसे न्यूड पाहिले आहे. ‘लायगर’ चित्रपटाच्या एका पोस्टरसाठी विजय न्यूड झाला होता. एक पोस्टर समोर आलं होतं ज्यात विजय कपड्यांशिवाय दिसला. 

शो दरम्यान विजयला रश्मिकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे का असा प्रश्न विचारता अभिनेता म्हणाला, ‘आम्ही एकत्र 2 चित्रपट केले आहेत आणि ती एक डार्लिंग आहे. मला ती खूप आवडते. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि आम्ही चित्रपटांविषयी चर्चा करतो आणि एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर करतो. चित्रपटांमध्ये, आपण खूप वेळ एकत्र असतो म्हणून आपण जवळ येतो आणि त्यामुळे एक बॉन्ड खूप लवकर तयार होतो.” त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारले असता, विजय म्हणाला, “माझे आई-वडील आणि दिग्दर्शक पुरी यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत.’

करण जोहरच्या शोमध्ये कलाकार आपले खासगी आयुष्य, प्रेम आणि जवळच्या मित्रांशी संबंधीत खुलासे करताना दिसतात. विशेषतः करणच्या शोमध्ये अनेकदा खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे होतात. 7 व्या सीझनमध्येही आतापर्यंत अक्षय कुमार, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि समंथा सारख्या कलाकारांनी हजेरी लावली आहे आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *