Ranveer Singh ला रिपोर्टन ओळखलंच नाही; अभिनेत्यानं अशी करुन दिली ओळख, पाहा Video


मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर हा सध्या UAE मध्ये आहे. रणवीर त्याच्या कूल स्टाइलसाठी लोकप्रिय आहे. दरम्यान, सोशल मीडियावर रणवीरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक मीडिया रिपोर्टर रणवीरला ओळखू शकत नाही आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  (Ranveer Singh Viral Video)

रिपोर्टरने रणवीर सिंगला ओळखलं नाही

ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की F1 रिपोर्टर मार्टिन ब्रंडल रणवीरची मुलाखत घेतोय, परंतु मार्टिन रणवीरला ओळखत नाही. सुरुवातीच्या संभाषणात, तू कसा आहेस असा प्रश्न रिपोर्टर विचारतो यावर उत्तर देत, रणवीर पूर्ण उत्साहाने त्याच्या भावना व्यक्त करतो आणि म्हणतो, ‘मी ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड असल्याचं वाटतयं. पण मध्येच मार्टिन रणवीरला म्हणतो सॉरी मी तुला ओळखलं नाही. (Ranveer Singh Trending Video)

यावर रणवीर सिंग मार्टिन ब्रंडलला साधे आणि नम्रपणे उत्तर देत म्हणाला, ‘मी बॉलिवूड अभिनेता आहे, सर. मी मुंबई भारतातून आहे.’ यानंतर मार्टिन रणवीरला म्हणतो की, धन्यवाद की तू स्वत:ची अशी ओळख करून दिली आहेस. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याचे कौतूक केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. (ranveer singh refused to recognize by f1 reporter watch how he introduced him self video 

हेही वाचा : Live In Relationship : ‘या’ कोट्याधीश Businessman सोबत Miss World Manushi Chhillar राहते लिव्ह इनमध्ये ?

काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत रणवीर सिंग खऱ्या आयुष्यातही डाउन टू अर्थ व्यक्ती आहे, असे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी चित्रपटसृष्टीतील एवढा मोठा सुपरस्टार असूनही त्यानं त्या पत्रकाराला लाज वाटू दिली नाही आणि स्वत:ची सहज ओळख करून दिली, अशी कमेंट केली. तर दुसरीकडे त्याला ट्रोल करत नेटकरी म्हणाले, ‘रणवीरला बाहेर कोणी ओळखत नाही. तो काही मोठा अभिनेता नाही.’Source link

Leave a Reply