Headlines

Ranji Trophy 2022: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का?

[ad_1]

Arjun Tendulkar Century : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar) लेक अर्जुन तेंडुलकरला यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2022) गोवा क्रिकेट संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली आणि अर्जुनने या संधीचं सोन केलं.  त्याला मुंबई क्रिकेट (mumbai cricket team) संघाकडून पदार्पणाची संधी मिळत नसल्याने त्याने गोवा क्रिकेट संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. गोवा क्रिकेट संघाने त्याची चाचणी घेत त्याला यंदाच्या रणजी सामन्यांमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. अर्जुनने त्यांचा हा निर्णय अगदी बरोबर असल्याचे सिद्ध केले आहे.  मात्र चांगली कामगिरी करूनही अर्जुनला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी शक्यता कमी आहे. नेमकं त्यामागच कारण आहे त्याबद्दल जाणून घ्या… 

दरम्यान आतापर्यंत अर्जुन तेंडुलकरची (Arjun Tendulkar) ओळख फक्त सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar)  मुलगा अशीच होती. मात्र आता या युवा खेळाडूने बुधवारी सामन्यात चमकदार कामगिरी केली. अर्जुन रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शतकवीर ठरला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी या डावखुऱ्या फलंदाजाने शतक ठोकले. अर्जुनने आपल्या शतकी खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार मारले. पण अर्जुनने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असूनही त्याला सध्या भारतीय संघात स्थान मिळू शकत नाही. कारण अर्जुनने पहिल्या सामन्यात शतक झळकावलं आहे, पण एका शतकामुळे त्याला लगेच टीम इंडियात जागा मिळणे सध्यातरी कठीण आहे. 

वाचा: पोलीस भरतीचे अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट  

अर्जुन तेंडुलकर बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करत आहे. विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजीमध्येही त्याने बॉल आणि बॅटने फटकेबाजी केली. मात्र असे असूनही त्याला सध्या भारतीय संघात खेळण्याची संधी मिळणार नाही.  कारण सध्या भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूंची कमतरता नाही, या संघात शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, दीपक चहर या खेळाडूंचा भरणा आहे. या सर्व खेळाडूंकडे भरपूर अनुभव देखील आहे. दुसरीकडे, अर्जुनचे करिअर नुकतेच सुरू झाले असून लगेच त्याला भारतीय संघात संधी देणे घाईचे ठरेल.  रणजी ट्रॉफीमध्ये अर्जुनने शतक साजरं केलं आहे. मात्र त्याने त्याच्या कामगिरीत आता सातत्य राखणे गरजेचं आहे. अर्जुनने त्याची कामगिरी अशीच सुरु ठेवली तर नक्कीच त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं नक्की उघडतील यात शंका नाही. 

दिनेश कार्तिकने केले अर्जुनचे जोरदार कौतुक 

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने (dinesh karthik) अर्जुन तेंडुलकरचे कौतुक करताना क्रिकबझला सांगितले की, ‘आम्ही अर्जुनला गोलंदाजीसाठी ओळखतो, तो फलंदाजी जाणतो. त्याने आपल्या पदार्पणाच्या शतकासह हे सांगितले की त्याने फलंदाजीत खूप मेहनत घेतली आहे. हे शतक त्याच्यासाठी खास आहे. गोलंदाजीनंतर ही कामगिरी करण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्याच्यात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. मी त्याला इंग्लंडमध्ये सराव करताना पाहिले आहे’.  

गोव्यात खेळण्यासाठी अर्जुनने मुंबई सोडली

अर्जुन तेंडुलकरला मुंबई संघात स्थान न मिळाल्याने रणजीच्या या मोसमात गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णयही त्याच्यासाठी चांगलाच ठरला आणि त्याने पदार्पणातच राजस्थानविरुद्ध शतक झळकावले. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *