भिकाऱ्याने दाखवली रणधीर कपूर यांना त्यांची जागा…


मुंबई : ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर (Randhir Kapoor)यांचा स्वभाव खूप मजेशीर आहे. नुकतेच ते द कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाले होते. अतिशय मोकळ्या स्वभावाचे असलेले रणधीर कपूर यांनी त्यांच्या आयुष्याशी निगडीत एक किस्सा या कार्यक्रमात सांगितला होता. 

रणधीर कपूर यांना एका भिकाऱ्यानने त्यांची जागा दाखवून दिली. रणधीर कपूर या घटनेने खूप दुखावले गेले. पण त्यांनी नाराज न होता पुढे जे केलं ते सर्वात महत्वाचं होतं. 

रणधीर कपूर यांना भिकाऱ्याने दाखवली जागा 

रणधीर कपूर यांनी सांगितलं की, जेव्हा मला काम मिळू लागलं. ठिक-ठाक कमाई होऊ लागली. त्यानंतर मी एक छोटी कार खरेदी केली. 

याच गाडीने त्यांचं येणं जाणं सुरू झालं. एके दिवशी त्या गाडीने येताना रणधीर कपूर यांना एक भिकारी भेटला. 

भिकाऱ्याने रणधीर कपूर यांना पाहून म्हटलं की, किती लहान गाडी आहे ही. सिनेमात तर एवढ्या मोठ मोठ्या गाड्या असतात. 

भिकारीचं हे बोलणं रणधीर यांच्या जिव्हारी लागलं. यानंतर त्यांनी निर्मात्यांकडे पैसे मागितले आणि आपल्या पत्नीकडून पैसे घेतले. यातून त्यांनी एक आलिशान कार खरेदी केली. 

ही गाडी घेऊन जेव्हा ते आपल्या वडिलांकडे आहे. तेव्हा त्यांनी वडिलांना सांगितलं की, तुम्ही देखील एक नवी कोरी मोठी कार खरेदी करा. 

तेव्हा राज कपूर यांनी दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. बाळा नव्या गाडीची गरज तुला आहे. मला नाही. जर मी बसने प्रवास केला. तर राज कपूर म्हणतील की, बघा राज कपूर बसने प्रवास करत आहेत. Source link

Leave a Reply