Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : तू मेरी है, मेरी ही रहेगी….; आलिया-रणबीरचं लग्न थांबववण्यासाठी ‘रोमिओ’ची धाव


मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा हालचालींना वेग आला आहे. आलिया आणि रणबीरनं अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांच्या नात्याला एक वेगळं वळण देण्याचा निर्णय घेतला. (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding)

आपआपल्या कामातून वेळ काढत आता ही जोडी पुढचे काही दिवस सर्वस्वी त्यांच्या या नात्याला वेळ देणार आहेत. बॉलिवूडमध्ये या बहुप्रतिक्षित लग्नाचा दिवस जवळ येत असतानाच चाहते आणि सेलिब्रिटी मंडळींनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. 

आलियासुद्धा तिच्या लग्नाच्या तयारीला लागली आहे. पण, अशी एक व्यक्ती आहे जी हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. आलिया लग्न करणार असल्याचं कळताच या व्यक्तीनं हे सर्व थांबवण्यासाठी सुस्साट वेगानं धावही मारली आहे. 

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. फक्त व्हिडीओच नव्हे तर त्याच्यासोबतचे आलियाचे फोटोही समोर आले आहेत. जे पाहता एक न पाहिलेलं नातं सर्वांसमक्ष आलं आहे. राहिला मुद्दा असा, की आलियाचं खरंच याच्याशी काय नातं होतं? 

डोक्याला जास्त ताण देण्याची गरज नाही. कारण आलियाच्या असंख्य चाहत्यांपैकी हा व्यक्तीसुद्धा एक आहे. ज्यानं तिच्यावरील प्रेमापोटी हा व्हिडिओ बनवला आहे. 

हा व्हिडीओ बनवण्याचं कारण म्हणजे एक कलाकार म्हणून त्याचं आलियावर असणारं प्रेम आणि ही व्यक्त म्हणजे युट्यूबर, व्लॉगर, कंटेंट क्रिएटर बी युनिक Beyounick. ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील ‘तू मेरी है मेरी ही रहेगी’ हे गाणंही या व्हिडीओमध्ये वाजताना दिसत आहे. खुद्द आलियालाही हा व्हिडीओ पाहून हसू आवरता आलेलं नाही. ज्यामुळं हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमाल ट्रेंड होताना दिसत आहे. 

काय मग, हा व्हिडीओ पोहून म्हणावसं वाटतंय ना.. ऐसी दिवानगी देखी नही कही… Source link

Leave a Reply