Ranbir Alia Wedding : लग्न होण्याआधीच… रणबीरच्या हातातील हे बाळ कुणाचं?


मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाची तारीख हा हा म्हणता जवळही आली. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसोबतच चाहतेसुद्धा या लग्नासाठी सध्या अत्यंत उत्सुक दिसत आहेत. (Ranbir Alia Wedding )

दोघांचीही घरं सजली, लग्नाचे कपडे, दागदागिनेही आले आता वाट पाहिली जातेय ती फक्त लग्नाचा मुहूर्ताची. जेव्हा आलिया आणि रणबीर आयुष्यभरासाठी एकमेकांचा जोडीदार म्हणून स्वीकार करतील. 

आता इतक्या मोठ्या सेलिब्रिटींची लग्न म्हटल्यावर चर्चा तर होणारच. याच चर्चांच्या गराड्यात आणखी एका विषयानं असंख्य चर्चांना वाव दिला आहे. या चर्चा आहेत रणबीरच्या हातात दिसणाऱ्या एका बाळाच्या. 

आलिया आणि रणबीर लग्नाच्या बेडीत अडकलेही नाहीत तोच त्यांच्या मुलाबाळांच्या चर्चा सुरु आहेत. याला हवा देतो तो म्हणजे रणबीरच्या बहिणीनं साधारण वर्षभरापूर्वी इन्स्टाग्राम स्टेटसमध्ये शेअर केलेला एक फोटो. 

दरम्यान, इथं बाळाची चर्चा सुरु असतानाच अभिनेता संजय दत्त यानंही रणबीर आणि आलियाला अजब सल्ला दिला आहे. जेव्हा त्याच्या कानावर या लग्नाची बातमी पोहोचली तेव्हा संजूबाबाची प्रतिक्रिया ऐकण्याजोगी होती. 

‘खरंच तो लग्न करत असल्यास मला फार आनंद होतोय. आलिया माझ्या डोळ्यांसमोर मोठी झालीये. लग्न म्हणजे आयुष्यभरासाठी त्यांनी एकमेकांना दिलेली हमी आहे. त्यांना या वचनाला जागावं लागेल, आनंदान आणि भरभराटीनं पुढे जावं लागेल. तुला लवकर मुलं होवो रणबीर… आनंदी राहा’, असं संजूबाबा म्हणाला. (Sanjay Duttt on ranir alia wedding)

रणबीर- आलियाच्या नात्यात लवकरात लवकर मुलं व्हावीत अशी इच्छा बाळगणाऱ्या संजूबाबाच्या या हटके शुभेच्छा तुम्हाला कशा वाटल्या ?Source link

Leave a Reply