Ranbir – Alia Wedding: एकदम बेश्ट! लग्न होताच रणबीरची मोठी घोषणा, आज Video समोर


मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट विवाहबंधनात अडकले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत आलिया आणि रणबीरनं लग्नगाठ बांधली त्यानंतर खास मित्रांच्या हजेरीमध्ये त्यांच्या लग्नाच्या पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. हे सारं पार पडत असतानाच तिथं या नव्या जोडीच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत होते. 

लग्नाचे क्षण, त्याआधीचे विधी, समारंभ आणि कुटुंबीयांचा एकच कल्ला हे सर्वच फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांनी पाहिलं. अतिशय छोटेखानी पण तितकाच खास विवाहसोहळा कसा असतो, हेच रणबीर आणि आलियानं दाखवून दिलं. (Ranbir – Alia Wedding)

त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक गोष्ट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. अगदी रणबीरनं लग्न होताच केलेली घोषणासुद्धा. (Bollywood)

आलियाच्या गळ्यात हार घातल्यानंतर, कुटुंबीयांनी या जोडीला शुभेच्छा देण्यात सुरुवात केली. रणबीरनं अतिशय सुरेख अंदाजात आलियासमोर गुडघ्यांवर तिनं घातलेल्या हाराचा स्वीकार केला तिथंच त्यानं सर्वांची मनं जिंकली. 

पुढे, त्यानं जे केलं ते म्हणजे Moment of the year. ‘say hi to my wife’, असं तो तिथं असणाऱ्या सर्वांना म्हणाला. बरं सर्वांनी त्याच्या सांगण्य़ावरून आलियाला hiii सुद्धा केलं. आलियाच्या चेहऱ्यावर त्यावेळी लाजेची लाली पाहायला मिळाली. 

आपल्या जोडीदारानं पहिल्यांदाच आपली ओळख पत्नी म्हणून करुन देणं कोणत्याही महिलेसाठी आनंदाचीच बाब. आलियासाठीसुद्धा हा क्षण असाच काहीसा होता, हे तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सांगून गेला. 

लग्नानंतर लगेचच आलिया आणि रणबीर या दोघांनीही त्यांच्या कामावर लक्ष देण्यास सुरुवात केली. या जोडीची कामाप्रती असणारी समर्पकता सर्वकाही सांगून गेली आणि पुन्हा एकदा त्यांच्यावरील प्रेमात आणखी भर पडली. Source link

Leave a Reply