Ranbir- Alia Wedding : गुंजा सा है कोई इकतारा…. लग्नबंधनात अकडकले आलिया- रणबीर; पहिलावहिला Emotional फोटो Viral


Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : पहिली भेट, पहिला क्रश, पहिलं प्रेम आणि अर्थात मनात ठसलेली पहिली व्यक्ती आलियाच्या आयुष्यात एका वेळी कायमच्या घर करून गेल्या. या सर्व व्यक्ती म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व असणारा तिचा पती, अभिनेता रणबीर कपूर. प्यार दोस्ती है… असं त्यांच्या नात्याविषयी बोलणं गैर ठरणार नाही. 

कारण मैत्रीपासन सुरु झालेलं हे नातं आज सहजीवनाच्या वळणावर आलं आहे. मुंबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्नगाठ बांधली आहे. 

काही दिवसांपूर्वी एकाएकी या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नाची माहिती समोर आली आणि एकाएकी लगबग, घाई गडबजडीचं चित्र पाहायला मिळालं. 

दोघांचीही कुटुंब आणि मित्रपरिवार यावेळी त्यांना साध देताना आणि मोठा आधार देताना दिसला. सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा स्वीकारत आलिया आणि रणबीर आता मिस्टर आणि मिसेस कपूर, म्हणून ओळखले जातील. 

दरम्यान, अद्यापही रणबीर आणि आलियाचे फोटो समोर आले नसले तरीही त्यांच्या कुटुंबीयांचे वेडिंग लूक समोर आले आहेत. रणबीरची आई नीतू कपूर, बहीण करिना कपूर, अभिनेता सैफ अली खान आलियाची आई, सोनी राजदान या सर्वांचे फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

प्रेमावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी ही जोडी आदर्श आहे. कोणाचं प्रेम आहे तर कोणासाठी रक्ताचं नातं नसतानाही जवळचं माणूस आहे. अशा या नवविवाहित दाम्पत्याला झी 24 तास कडून नव्या आयुष्याच्या अगणित शुभेच्छा. Source link

Leave a Reply