Ranbir- Alia Wedding : लग्नानंतर काही क्षणांतच बदललं आलियाचं रुप; लेहंगा नाही, साडीही नाही… पाहा कशी दिसतेय नववधू


Ranbir- Alia Wedding : सध्या बॉलिवूडमध्ये कोणत्या चित्रपटाची, कोणत्या अभिनेत्याची किंवा कोणत्याही नव्या प्रोजेक्टची चर्चा सुरु नाहीये. कारण, सध्या एकाच विषयावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. हा विषय म्हणजे आलिया आणि रणबीरचं लग्न. 

जवळपास पाच वर्षांच्या रिलेशनशिपला आलिया आणि रणबीरनं नव्या वळणावर आणत तितक्या रंजक प्रवासाची सुरुवात केली. 

हा प्रवास म्हणजे सहजीवनाचा. इथून पुढं आलिया आणि रणबीरनं नाव कायमच एकत्र घेतलं जाईल. या सेलिब्रिटी विवाहसोहळ्याचे असंख्य फोटो आतापर्यंत चाहत्यांनी पाहिले. 

पण, लग्नसोहळ्यानंतर ‘वास्तू’मध्ये नेमकं काय झालं, याची तुम्ही कल्पना केली आहे का ? अतिशय सुरेख अशा विवाहसोहळ्यानंतर आलिया आणि रणबीरनं लगेचच त्यांचे लूक बदलले. 

निमित्त होतं ती म्हणजे पोस्ट वेडिंग पार्टी, अर्थात लग्नानंतर आयोजित केलेली पार्टी. लग्नाच्या वेळी घातलेले कपडे बदलून लगेचच या नवविवाहित जोडीनं Comfertable लूकला पसंती दिली. 

यावेळी दोघांनीही लाल रंगाला प्राधान्य दिलं. आलियानं यावेळी लाल रंगाचा पायघोळ अनारकली सूट घातला होता. तर, रणबीरनं शुभ्र सदरा आणि लाल रंगाची बंडी घातली होती. 

पोस्ट वेडिंग पार्टीमध्ये एकच कल्ला पाहायला मिळाला. यावेळी या जोडीनं रोमँटिक डान्सही केला. इतकंच नव्हे तर, ‘छैय्या छैय्या’ या गाण्यावरही या दोघांनी ठेका धरला. 

अतिशय सुरेख अशा या क्षणी कुटुंबीयांनीही टाळ्या वाजवत या नवविवाहित दाम्पत्याच्या परफॉर्मन्सला दाद दिली. Source link

Leave a Reply