Ranbir- Alia च्या पार्टीत मलायकाच्या चेहऱ्यावर ‘हे’ कसले व्रण? पाहून अर्जुनही चिंतेत


Arjun Kapoor Malaika Arora : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी अतिशय छोटेखानी समारंभात लग्न उरकलं. अवघ्या 28 पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीनं लग्नगाठ बांधल्याचं सांगितलं गेलं. ज्यानंतर खरी धमाल उडाली ती म्हणजे त्यांच्या लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये.

कलाजगतातील मित्रपरिवाराला यावेळी Ranbir – Alia नं आमंत्रित केलं होतं. त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन सर्वांनी या पार्टीला हजेरी लावली.

अगदी शाहरुखपासून ते तारा सुतारियापर्यंत सर्वांनीच पार्टीत कल्ला केला. यावेळी माध्यमांसोबतच पार्टीला आलेल्यांच्याही नजरा खिळल्या अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यावर.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका मोठ्या अपघातानंतर मलायका इतक्या मोठ्या कार्यक्रमात पहिल्यांदाच आली होती. तिला इथं सोबत होती प्रियकर, अभिनेता अर्जुन कपूर याची.

मलायकानंही बऱ्याच काळानंतर तिच्या या मित्रपरिवाराची भेट घेत पार्टीचा आनंद घेतला. यावेळी तिला काय हवं नको या साऱ्याची काळजी अर्जुन घेताना दिसला.

अर्जुन मलाइका बने टॉक ऑफ द टाउन

पार्टीत एंट्री करतेवेळी मलायचाकी झलक काही छायाचित्रकारांनी टीपली. यावेळी तिच्या भुवयांच्या मधोमध अपघातामुळं झालेल्या जखमेचा व्रण स्पष्टपणे दिसत होता.

व्रण पाहता मलायका अद्यापही या जखमेतून सावरत असल्याचंच स्पष्ट झालं. दरम्यान, पार्टीसाठी मलायका आणि अर्जुन दोघंही एकाच कारमधून आले.

करिश्मा मलाइका की अनसीन तस्वीर

मलाइका की चोट का निशान

एक ही गाड़ी में हुए स्पॉट

अपघात झाल्यापासून शक्य तितकी काळजी घेत अर्जुन मलायकाची पावलोपावली साध देताना दिसत आहेत. किंबहुना त्यांचं नातं यामुळं आणखी घट्ट झाल्याचं म्हटलं जात आहे.

आता आपल्या सेलिब्रिटी मित्रांच्या लग्नाची पार्टी गाजवणारी ही जोडी, त्यांच्या लग्नाची गोड बातमी केव्हा देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.Source link

Leave a Reply