रणबीर- आलियाच्या बाळाच्या जन्माआधीच ‘या’ व्यक्तीला त्याची भीती, वाचा काय आहे प्रकरण


मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि रणबीर कपूरची पत्नी आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये ती गरोदर असल्याचं तिने जाहीर केलं आहे. आलिया भट्टने इन्स्टाग्रामवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्वतःचा आणि रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी ती अल्ट्रासाऊंड मशीनच्या स्क्रीनकडे पाहतेय. या फोटोच्या पोस्टला ‘आमचं बाळ लवकरच येणार आहे’, असं तिने कॅप्शन दिलं आहे.

आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची बातमी कळताच सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. यावेळी उत्तराखंड पोलीसांनीही यांसंदर्भात एक ट्विट केलंय. त्याचबरोबर काही युजर्सनी खूप मजेशीर कमेंट्सही केल्या.

दुसरीकडे सोशल मीडियावर लोकांनी या जोडप्याचं अभिनंदन करण्यास सुरुवात केली. यावेळी कंडोम ब्रँड ड्युरेक्सही मागे राहिला नाही. ‘मेहफिल में तेरी, हम तो क्लियरली नहीं थे’ असं मजेशीर ट्विट कंपनीने केलंय.

याआधीही रणबीर-आलियाचे 14 एप्रिलला लग्न झालं होतं, तेव्हाही ड्युरेक्सने त्यांच्या मजेशीर अंदाजात त्यांचं अभिनंदन केलं होतं. 

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल रोजी लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर कपूर कुटुंबातून एक आनंदाची बातमी समोर आली. साधारण दुसऱ्याच महिन्यात आलियानं केलेली ही पोस्ट पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. Source link

Leave a Reply