rana couple s financial links with notorious yusuf lakdawala sanjay raut allegations zws70अमरावती : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केलेल्या आरोपांचीही चर्चा सुरू झाली आहे. कुख्यात युसूफ लकडावाला याचे राणा दाम्पत्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी तीन महिन्यांपूर्वी केला होता. आता, राज्यात झालेल्या सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

युसूफ लकडावालाकडून नवनीत राणांनी ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. राणा दाम्पत्याने मात्र हे आरोप फेटाळून लावले. दुसरीकडे, हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक अफरातफरीशी निगडित असल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करणार का, असा सवाल राऊत यांनी केला होता. राऊत यांनी नवनीत राणा यांच्या निवडणूक शपथपत्रातील कागदपत्रांच्या आधारे हे आरोप केले. लकडावाला याचे कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध होते. अनेक गुन्हेगारी व दहशतवादी कारवायांशी त्याचा संबंध होता. तुरुंगात असतानाच तो मरण पावला. राणा यांनी लकडावालाकडून ही रक्कम कर्जरूपाने का व कशासाठी घेतली, त्याच्याशी काय संबंध होते, असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले होते. नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या शपथपत्रातील जंगम मालमत्तांच्या तपशीलात गुंतवणुकीविषयीच्या रकान्यात क्रमांक ३ वर युसूफ लकडावाला – ८० लाख रुपये असा उल्लेख आहे. याआधारे संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर आरोप केले.

आरोप खोटे आहेत. आम्ही युसूफ लकडावाला याला ओळखतही नव्हतो. तो एक बांधकाम व्यावसायिक होता. त्याच्या गृह प्रकल्पातील एक सदनिका आम्ही विकत घेतली. पोलिसांनी ‘एसआयटी’मार्फत चौकशी केली आणि ही ‘फाईल’ बंद  झाली आहे. संजय राऊतांना पुरावे सादर करता आले नाही, आरोप केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तेही काही बोलू शकले नाहीत. – रवी राणा, आमदार, बडनेरा.Source link

Leave a Reply