रमेश देव यांच्या निधनानंतर आता कुठे सावरतंय कुटुंब; लेकीजोग्या सुनेची भावनिक पोस्ट देतेय संकेत


मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील एक हरहुन्नरी व्यक्तीमत्त्वं. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदानं आणि उत्साहानं जगणाऱ्या या अभिनेत्यानं कायमच आपल्या अस्तित्वानं इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं. (Ramesh Deo Smita Deo)

चित्रपटांच्या माध्यनांतून देवांनी विविध भूमिका साकारल्या. त्यांना अनेकदा साथ मिळाली ती म्हणजे पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची. 

देवांचं कुटुंब आणि कलाजगताचं तसं अनोखं नातं. म्हणूनच की काय आज रमेश देव यांच्या निधनाला काही दिवस उलटूनही त्यांचं कुटुंब या दु:खातून सावरताना मोठी धडपड करताना दिसत आहे. 

देव यांचा मुलगा अभिनय देव याची पत्नी, स्मिता देव हिनं लिहिलेली एक सोशल मीडिया पोस्ट पाहून हेच लक्षात येत आहे. 

स्मिता स्वत: एक युट्यूबर, लेखिका आणि एक उत्तम गृहिणी. खुद्द रमेश देव यांनाही आपल्या या सुनेचा प्रचंड अभिमान होता. आपल्या पोटच्या लेकीप्रमाणं त्यांचं तिच्यावर प्रेम होतं. 

सासऱ्यांनी इतका जीव लावलेला असताना स्मितानंही वेळोवेळी तिच्या या चिरतरुण सासऱ्यांची साथ दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं देव यांच्याशी असणारं नातं वारंवार समोर आलं. 

सासऱ्यांच्या निधनाचा स्मितालाही मोठा धक्का बसला होता. मागील कैक दिवस तिचा सोशल मीडियावर अजिबात वावर नव्हता. पण, आयुष्य आणि वेळ कोणासाठी थांबत नाही, याच सिद्धांताचा पाठलाग करत स्मिता आता पुन्हा एकदा तिच्या कामाची सुरुवात करताना दिसत आहे. 

आपल्या कामाच्या माध्यमातूनच जणून तिनं सासऱ्यांना आवडणाऱ्या माध्यमातूनच त्यांना आदरांजली वाहिली आहे. 

‘कोविडचा संघर्ष आणि अतिशय मोठा असा वैयक्तिक तोटा झालेला असताना पुन्हा एकदा जेवणाला लागावं, काहीतरी बनवावं असं मला वाटतंय. कारण यातूनच मी दु:खातून बाहेर येऊ शकेन’, अशी पोस्ट तिनं लिहिली. 

जेवणाचा सुरेख बेत करत या माध्यमातून स्मिता व्यक्त झाली. मुळात तिच्या हातच्या पदार्थांना कमालीची चव असते असं रमेश देव शक्य तितक्या वेळेस म्हणताना दिसले. 

स्मिताची ही नवी सुरुवात याच रमेश देव यांना समर्पित असावी अशीच भावना यातून सर्वांपर्यंत पोहोचली. Source link

Leave a Reply