“रामदास कदमांचा मेंदू सडला आहे की…” उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर चंद्रकांत खैरेंचा संताप | shivsena leader chandrakant khaire on ramdas kadam offensive statement about uddhav thackeray rmm 97



मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली आहे. विविध ठिकाणी केलेल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. दरम्यान, अलीकडेच दापोली येथे पार पडलेल्या भाषणात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. रामदास कदमांच्या विधानानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही संताप व्यक्त केला आहे.

रामदास कदम यांनी जोड्याने मार खाण्याची वेळ स्वत:वर येऊ देऊ नये, असा इशारा खैरेंनी दिला आहे. मंत्री आणि राज्यमंत्री पदावर असताना रामदास कदम भ्रष्ट्राचार कसे करायचे? याचा खुलासाही खैरेंनी केला आहे. राज्यमंत्रीपदी असताना रामदास कदम रेशन दुकानात जाऊन तपास करायचे, त्यांच्याकडून पैसे मिळाले की शांत बसायचे, असं विधान चंद्रकांत खैरेंनी केलं आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “…तर आम्ही उद्धव ठाकरेंचं स्वागत करू” महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत राहुल शेवाळेंचं मोठं विधान

यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले की, रामदास कदम औरंगाबादमध्ये अडीच वर्षे पालकमंत्री होते. दरम्यानच्या काळात त्यांनी सगळ्यांना त्रास दिला, शिव्या दिल्या. ज्या उद्धव ठाकरेंनी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी त्यांना मंत्री केलं, त्यांच्याविरोधातच आज ते बोलत आहेत. मी ‘वन आणि पर्यावरण’ खात्याचा मंत्री होतो. मी अनेकांना मदत केली. अनेकांना याठिकाणी उद्योग सुरू करायला लावले. पण रामदास कदमांनी माझ्याच संभाजीनगरमधील अनेक कंपन्यांना नोटीसा दिल्या, त्यांना उद्योग बंद करण्यास सांगितलं, अशी टीका चंद्रकांत खैरेंनी केली आहे.

हेही वाचा- “…तर आम्हीपण तुमच्या गटात येतो” ठाकरे गटातील आमदारांच्या रात्रीच्या फोनबाबत शहाजीबापू पाटलांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, आज हा माणूस उद्धव ठाकरेंबाबत जी टीका करत आहे, ती लाजीरवाणी बाब आहे. या माणसाचा मेंदू सडलाय की काय? असा प्रश्न पडतो. सध्या राज्यात सगळीकडे ‘जोडे मारो’ आंदोलन सुरू आहे. पण लोकं त्याला प्रत्यक्षात जोडे मारल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे रामदास कदमांनी आता माफी मागायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असं बोलणाऱ्या माणसाला अक्कल नाही. आतापर्यंत त्याच्या फोटोवर जोड्याने मारलं आहे. पण प्रत्यक्षात जोडे खाण्याची वेळ त्यांनी स्वत:वर येऊ देऊ नये, अशा इशारा चंद्रकांत खैरेंनी दिला आहे.



Source link

Leave a Reply