राम गोपाल वर्मांचा आणखी एक व्हिडीओ; रात्रीच्या अंधारात एका हातात ग्लास, दुसऱ्या ‘ती’


मुंबई : चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी कायमच त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काही गंभीर विषयांना हात घालत त्यांनी चौकटीबाहेरचं कथानक असणारे चित्रपट त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणले. पण, सध्या मात्र वर्मा भलत्याच कारणांनी चर्चेत असतात. निमित्त ठरतंय ते म्हणजे राम गोपाल वर्मा यांचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ. (Ram gopal verma)

नुकताच वर्मा यांनी त्यांचा 60 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांचा खास मित्रपरिवार हजर होता. हैदराबादमधील एका पबमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

पार्टी, जल्लोष वगैरे सर्वकाही ठीक. पण,  नजरा तेव्हा वळल्या जेव्हा वर्मा यांच्यासोबत अभिनेत्री नैना गांगुली इंटिमेट होताना दिसली.

लाल रंगाची साडी नेसून ती या पार्टीसाठी आली होती. इथं एका हातात मद्याला ग्लास असणाऱ्या वर्मा यांनी एका हातानं नैनाला पकडलं होतं. तिनं लगेच त्यांच्या गालावर Kiss करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

नैनानंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आणि पाहता पाहता हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. नैहा वर्मा यांच्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘खतरा – डेंजरस’ या चित्रपटाचा एक भाग असल्यामुळं तिचं त्यांच्याशी घट्ट नातं असल्याचं म्हटलं जात आहे.

वर्मा यांच्या भोवती असणारं वादाचं वलय काही नवं नाही, तसाच त्यांचा एखाद्या अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ व्हायरल होण्याचीसुद्धा ही काही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. जिथं ते अभिनेत्रीसोबत ‘हाय रामा ये क्या हुआ’ या गाण्यावर डान्स करताना दिसले होते.Source link

Leave a Reply