Rakhi Sawant चा पोलिस स्टेशनमध्ये हटके अंदाज, ‘गंगूबाई’ स्टाईलमध्ये पडली बाहेर


Rakhi Sawant Arrested : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतच्या (Rakhi Sawant) आयुष्यात सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टी घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतय. सगळ्यात आधी राखीनं बॉयफ्रेण्ड आदिल खानशी लग्न केलं त्यानंतर तिच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान, काल राखीला आंबोली पोलिसांनी (Aamboli Police Station) ताब्यात घेतले होते. अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherrlyn Chopra) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती. शर्लिननं केलेल्या तक्रारीनंतर तिला ताब्यात घेण्यात आले होते. तर राखीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. राखी सावंतची चौकशी केल्यानंतर तिला जाऊ दिले. यावेळी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राखीनं गंगूबाईच्या स्टाइलमध्ये एण्ट्री केली आहे. यावर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत राखीनं हिजाब परिधान केल्याचे दिसत आहे. चौकशी झाल्यानंतर पोलिस स्टेशनमधून बाहेर पडताना गंगुबाई प्रमाणे हात जोडताना दिसते. राखीची ही स्टाईल तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

राखीच्या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, शर्लिन राखीला काही करू शकत नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, राखी एक मंत्र्यासारखी वागते. काही नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की राखी ही मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील एक कॅरेक्टर वाटते. दुसरा नेटकरी म्हणाला, राखीच न थांबणार अॅडव्हेनचर, नेटकऱ्यांनी अशा अनेक भन्नाट कमेंट केल्या आहेत. 

हेही वाचा : Prarthana Behere चा हा बोल्ड लूक पाहिलात का? एकच चर्चा

दरम्यान, शर्लिन चोप्राने राखीवर आरोप केला होता की ती तिची बदनामी करत आहे आणि तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो ऑनलाइन रिलीज करत आहे. गेल्या वर्षीही शर्लिन चोप्राने राखी सावंतविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

राखी सावंतच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिनं यापूर्वी लग्नाचे फोटो शेअर करत खुलासा केला की तिनं 7 महिन्यांपूर्वीच मुस्लिम पद्धतीनं लग्न केलं. आदिलला हे सगळ्यांपासून लपवायचे होते. इतकंच काय तर राखीनं  खुलासा केला की तिनं फक्त आदिलशी लग्न केले नाही तर तिनं मुस्लिम धर्म देखील स्विकारला आहे. धर्म स्विकारल्यानंतर राखीनं तिचे नाव देखील बदलले आहे, तिचं नाव आता फातिमा असल्याचे तिनं सांगितले आहे.Source link

Leave a Reply