Headlines

राखी सावंत आणि आदिल खानच्या नात्यात दुरावा; अभिनेत्रीने केली बॉयफ्रेंड विरोधात तक्रार दाखल?

[ad_1]

मुंबई : सध्या शर्लिन चोप्रा आणि साजिद खान हा वाद चांगलाच तापला आहे. हा वाद सुरु असताना या प्रकरणात अभिनेत्री राखी सावंतने उडी घेतली होती. मात्र राखीला या प्रकरणात पडणं चांगलंच महागात पडलं आहे. हे प्रकरण संपता न संपता. राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळच्या चर्चेच कारण ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसू शकतो. कारण रिपोर्टनुसार राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल खानवर मारहाणीचा आरोप लावला आहे. अभिनेत्रीने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता अभिनेत्रीने यावर रिएक्शन दिली आहे.

एक्ट्रेस शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) सोबत सुरु असलेल्या वादादरम्यान समोर आलेल्या चर्चेदरम्यान अशा बातम्या समोर येत आहेत की,  राखी सावंत (Rakhi Sawant) ने  बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) विरोधात तक्रार दाखल केली आहे. 
 
वृत्तानुसार, राखी सावंतने आदिल खानवर मारहाणीचा आरोप केला आहे. दोघांमध्ये भांडण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि आदिलने राखी सावंतवर खर्च केलेले पैसे परत मागितले होते. राखीने नकार दिल्यानंतर आदिलने तिच्यावर हात उचलला.

आता राखी सावंतने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. या सर्व बातम्या खोट्या असल्याचं राखीचं म्हणणं आहे. या अफवांमुळे आदिल खूप अस्वस्थ आहे.

ETimes शी केलेल्या संभाषणात राखी सावंत म्हणाली, ”हा पूर्ण मूर्खपणा आहे आणि आमच्यात सर्व काही ठीक आहे. खरं तर, मी शर्लिन चोप्राच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आमचं नातं कोण बिघडवण्याचा प्रयत्न करतंय माहीत नाही. (Rakhi Sawant files FIR against boyfriend Adil Khan The actress gave this reaction on the news)

राखी सावंत पुढे म्हणाली, ”माझ्याबद्दल अशा अफवा कोण पसरवत आहे हे सगळं खोटं आहे. मी फक्त एकच तक्रार दाखल केली आहे आणि ती म्हणजे शर्लिन चोप्राच्या विरोधात. लोक अशा अफवा का पसरवत आहेत? माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याशिवाय त्यांना दुसरं काही काम आहे का?”

राखी सावंत सध्या शर्लिन चोप्रासोबतच्या कॅट फाईटमुळे चर्चेत आहे. अलीकडेच राखी सावंतने साजिद खानला सपोर्ट करत शर्लिनला ट्रोल केलं. नंतर शर्लिन चोप्रानेही राखी सावंतला खूप वाईट म्हटलं होतं. यानंतर राखीने शर्लिन चोप्रावर मानहानीचा खटला दाखल केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *