Raju Srivastava यांच्याविषयी शिवराळ भाषेत बरळणाऱ्या Standup Comedian ला नेटकऱ्यांनी धू- धू धुतलं


Raju Srivastava Death : स्टँडअप कॉमेडीला (Stand Up Comedy) नवी पहाट दाखवत असतानाच प्रचंड मेहनत घेणाऱ्या विनोदवीरांपैकी एक असलेला तारा, राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यानं अनेकांनीच दु:ख व्यक्त केलं, काहींनी श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांना आधारही दिला. पण, त्यांच्या निधनावर एका व्यक्तीची मात्र अतिशय विचित्र आणि तितकीच संताप देणारी प्रतिक्रिया पाहायला मिळाली. श्रीवास्तव यांच्याविषयी बरळणाऱ्या या व्यक्तीचं नाव, रोहन जोशी. 

‘ऑल इंडिया बकचोद’ (all india bakchod) चा स्टँडअप कॉमेडियन रोहन जोशी (Stan up comedian Rohan Joshi) यानं कमेंट करत नसत्या गोष्टींपासून सुटका झाली… अशी प्रतिक्रिया देत अनेकांच्या नजरा वळवल्या. शिवराळ भाषा वापरत रोहननं श्रीवास्तव यांना संबोधलं आणि त्याचा हा Attitude पाहून अनेकांच्या संतापचा पारा चढला. 

 

कॉमेडियन (Atul Khatri instagram) अतुल खत्रीनं एक पोस्ट लिहित जिथं श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली तिथंच रोहननं मात्र या कमेंटवर संताप व्यक्त करत ‘आपण काहीही गमावलं नाहीये’, अशी प्रतिक्रिया दिली. 

‘श्रीवस्तव यांनी कोणत्याही स्टँडअप कॉमेडियनची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही, कायमच त्यांनी त्यांचा अपमान केला… उगाचच ते विविध कार्यक्रमांमध्ये जाऊन नव्या विनोदवीरांना हीन वागणूक देत होते. हे सर्व अशासाठी की कॉमेडीच्या विश्वात नवी नावं समोर येताहेत आणि राजू यांना त्यांचे विनोदच कळत नाहीयेत… चार विनोद बनवले असतील त्यांनी पण, त्यांना मुळातच विनोदाची समज नव्हती’, असं रोहननं कमेंटमध्ये लिहिलं. 

(Rohan deleted the comment ) रोहनची ही कमेंट पाहिल्यानंतर लगेचच नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला. जे राजू श्रावास्तव यांचे चाहते नव्हते त्यांनीही त्याच्यावर निशाणार साधत काहीतरी मर्यादा ठेव, असं म्हणत त्याला भानावर यायचा सल्ला दिला. रोहनच्या कमेंटवर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेमध्ये संतप्त सूर पाहायला मिळाला. आपल्याला होणारा विरोध पाहता अखेर त्यानं ही कमेंट डिलीट केली. Source link

Leave a Reply