Headlines

Raju Srivastava यांचं निधन, मृत्यूशी झुंज अपयशी

[ad_1]

मुंबई : गेल्या 41 दिवसांपासून मृत्यूच्या दारात असलेल्या विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची झुंज अपयशी ठरली आहे. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण 41 दिवसांनंतरही त्यांनी शुद्ध आली नाही. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होते. पण राजू यांच्या निधनाची बातमी चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी आहे. 

संपूर्ण जगाला आपल्या विनोदाने हासवणाऱ्या विनोदवीराचं वयाच्या 59 व्या  वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, जिथे आज त्यांचं निधन झालं.

काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती समोर आली. पण राजू यांनी जगाचा अचानक निरोप घेतल्यामुळे चाहत्यांच्या मोठा धक्का बसला आहे. राजू यांच्या मृत्यूनंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देत आहेत. 

नेहमी हसतमुख दिसणारा चेहरा, मग तो टीव्ही स्क्रीनवर असो किंवा सोशल मीडिया अकाऊंटवर, आपल्या उत्कृष्ट विनोदबुद्धीमुळे कोट्यवधी लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजू यांचं निधन धक्कादायक आहे. मनोरंजन क्षेत्रात राजू यांची उणीव कोणीही भरून काढू शकणार नाही.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *