Raju Srivastav यांचा कुटुंबासोबत शेवटचा Video, पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी


मुंबई : प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला. आपल्या विनोदाने सर्वांना हासवणाऱ्या राजू यांच्या अचानक मृत्यू झाल्यानंतर कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या 59 व्या वर्षी राजू यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू यांच्यावर गोल्या 42 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. राजू यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी कुटुंब, चाहते प्रार्थना आणि डॉक्टर पूर्ण मेहनत करत होते, पण राजू यांच्या निधनानंतर सर्वांच्या भावना दुखाल्या आहेत. 

बुधवारी राजू यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, राजू यांचा कुटुंबासोबत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राजू प्रचंड आनंदी दिसत आहेत.  प्रकृती बिघडण्याच्या 15 दिवस आधी ते लखनऊच्या राजाजीपूरम येथे नातेवाईकाच्या घरी लग्नाला गेले होते. 

यावेळी राजू  कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसले. लग्न सोहळ्यात राजू श्रीवास्तव यांनी काही गाणीही गायली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ… 

10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांचं बुधवारी निधन झालं.

नेहमी हसतमुख दिसणारा चेहरा, मग तो टीव्ही स्क्रीनवर असो किंवा सोशल मीडिया अकाऊंटवर, आपल्या उत्कृष्ट विनोदबुद्धीमुळे कोट्यवधी लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजू यांचं निधन धक्कादायक आहे. मनोरंजन क्षेत्रात राजू यांची उणीव कोणीही भरून काढू शकणार नाही.Source link

Leave a Reply