Raju Shrivastav Death : ख्यातनाम स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन


नवी दिल्ली : ख्यातनाम स्टँड अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav Death) यांचं बुधवारी उपचारादरम्यान निधन झालं. सर्वांना खळखळून हसवणारा हा जिंदादिल विनोदवीर. मात्र त्याची ही अकाली एक्झिट तमाम चाहत्यांना चटका लावून गेली. (legendary standup comedian and actor raju shrivastav died at age of 58 years)

तो स्टँडअप कॉमेडीचा अमिताभ बच्चन होता.तो स्टेजवर आला की, हास्याची कारंजी फुलायची. पोट धरून हसता हसता पुरेवाट व्हायची. त्यानं जिवंत केलेला गजोधर भय्या तर गजब होता. पण आज हा गजोधर भय्या कायमचा पोरका झालाय.. कारण राजू श्रीवास्तव नावाच्या या अवलियानं स्टेजवरूनच नाही, तर आयुष्यातूनच कायमची एक्झिट घेतली.

‘गजोधर भय्या’ पोरका झाला 

गेले ४२ दिवस दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू होते… गेल्या १० ऑगस्टला ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना ते कोसळले. त्यांना तत्काळ एम्सच्या आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. तत्काळ अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवरच होते. मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज बुधवारी संपली… वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

राजू श्रीवास्तव यांचा 25 डिसेंबर 1963 रोजी कानपूरमध्ये जन्म झाला.अमिताभ बच्चन यांचे ते जबरा फॅन होते. अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करूनच त्यांनी कॉमेडियन म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. मैने प्यार किया, बाजीगर, बिग ब्रदर्स, बॉम्बे टू गोवा अशा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिकाही केल्या. द कपिल शर्मा शो, लाफ इंडिया लाफ, कॉमेडी सर्कस का जादू, कॉमेडी का महामुकाबला असे विनोदी शो त्यांनी गाजवले. 

राजू श्रीवास्तव यांनी 2014 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सपानं कानपूरमधून उमेदवारी दिली, पण त्यांनी माघार घेतली. 19 मार्च 2014 रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

निधनाच्या काही दिवस आधीच राजू श्रीवास्तव यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून त्यांचा अखेरचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला. कोरोना कॉलर ट्यूनच्या निमित्तानं शशी कपूर आणि विनोद खन्नाची नक्कल त्यांनी केली. आता राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांना हीच शेवटची आठवण कायमची जपून ठेवावी लागणाराय.Source link

Leave a Reply