Headlines

राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्र यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

बार्शी :बार्शी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्र यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन माजी मंत्री दिलीप सोपल ,शिवसेना नेते भाऊ साहेब आंधळकर ,अभिनेत्रि आशु सुरपुर ,नागेश अक्कलकोठे ,शहर प्रमुख दीपक आंधळकर, सुप्रीया गुंड पाटिल ,बार्शी शहर पोलीस निरीक्षक रामदास शेळके साहेब पत्रकार सुनील भोसले पुणे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकुण जीवन प्रवास बघता प्रजेबद्ल असलेले प्रेम, स्त्रीयांबद्ल असलेला आदर व सर्व जाती धर्माबद्लचा आदर भाव बघता.आपण ही यातून काही तरी शिकले पाहिजे. माजी मंत्री दिलीप सोपल मनोगत व्यक्त करताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम असे कुशल राजकारणी व शिस्त प्रिय राजे होते.जिवनात किती ही मोठा कठिण प्रसंग आला तरी स्वताः वरचा विश्वास डगमळु दयायचा नाही.हे महाराजांकडून शिकण्या सारखे आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मंडळाला भेट दिली.सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल तसेच शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर,नागेश अक्कलकोटे,पत्रकार सुनिल भोसले पुणे, बापू जाधव,विनोद वाणी,मनिष चौव्हान,अजीज मोगल आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजन्म उत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी अथक परीश्रम सगीर सय्यद,उपशहर प्रमुख इलियास शेख ,संतोष पुट्ठे ,इरफान बागवान यांनी घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *