Headlines

राजकारणाच्या मैदानात ‘मिस बिकिनी इंडिया’, या मतदारसंघातून लढवणार निवडणूक

[ad_1]

लखनऊ : उत्तर प्रदेशातल्या रणसंग्रामात सगळ्यात रंगतदार लढत होणार आहे ती हस्तिनापूरची, कारण काँग्रेसनं मिस इंडिया बिकिनी अर्चना गौतमला (Archana Gautam) रणसंग्रामात उतरवलंय,  असं काय आहे की या हस्तिनापूरच्या लढाईकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय, पाहुया. (up electipon 2022 congress has give candediture to archana gautam in Hastinapur assembly constituency)

कौरवांची राजधानी हस्तिनापूर. ज्या हस्तिनापुरात द्युत खेळला गेला आणि द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. तिथे यंदा मतांचा जबरदस्त जुगार खेळला जाणार आहे. हस्तिनापुरातल्या या युद्धात काँग्रेसनं उतरवलंय अर्चना गौतमला. मिस इंडिया बिकीनी ठरलेल्या अर्चनाची राजकारणात एन्ट्री होईल ती हस्तिनापुरातल्या खेळानं. 

भाजपचे विद्यमान आमदार दिनेश खटिक, काँग्रेसची अर्चना गौतम आणि सपाचे योगेश वर्मा अशी ती तिरंगी लढत होईल. अर्चना गौतमला उतरवणं ही काँग्रेसची चीप पब्लिसिटी आहे, असा भाजपचा आरोप आहे. तर एका अभिनेत्रीला राजकारणात येण्याची संधी म्हणून काँग्रेस अर्चनाच्या उमेदवारीचं समर्थन करतंय.

अर्चना गौतमबद्दल थोडक्यात 

अर्चना गौतम मास कम्युनिकेशनमध्ये पदवीधर आहे. अर्चनाने २०१४ मध्ये मिस यूपी हा किताब जिंकला. त्यानंतर तिने  २०१८ मध्ये ती मिस बिकीनी इंडियाचा मान पटकावला.  प्रियंका गांधींपासून प्रेरणा घेत राजकारणात आल्याचं अर्चना गौतम सांगते. लडकी हूं, लड सकती हूं… असा अर्चनाचा नारा आहे. 

हस्तिनापूरचं वैशिष्ट्य म्हणजे जो हस्तिनापूरचा आमदार होतो, त्याच पक्षाचं सत्ता येते. हस्तिनापुर नगरीतलं युद्ध किती आक्रमक आणि रंगतदार होणार, याची ही झाँकी आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *