राजस्थानच्या गोलंदाजांचा ‘हल्ला बोल’, आरसीबीवर 29 धावांनी विजय


मुंबई :  राजस्थान रॉयल्सने (rajasthan royals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (royal challengers bangalore) 29 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानने आरसीबीला विजयासाठी 145 धावांचे आव्हान दिले होते. मात्र आरसीबी 19.3 ओव्हरमध्ये 115 धावांवर ऑलआऊट झाली. (rr vs rcb ipl 2022 rajasthan royals win by 29 runs against royal challengers bangalore)

आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेसीसने सर्वाधिक 23 धावा केल्या. त्यानंतर वानिंदु हसरंगाने 18 धावा जोडल्या. शहबाज अहमदने 17 तर रजत पाटीदारने 16 रन्स केल्या. या व्यतिरिक्त आरसीबीच्या फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. 

राजस्थानकडून कुलदीप सेनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 3 तर फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर प्रसिध कृष्णाने 2 विकेट्स घेत या दोघांना चांगली साथ दिली. 

राजस्थानच्या गोलंदाजांनी छोट्या आकड्याचं शानदारपणे बचाव करत संघाला विजय मिळवून दिला.  राजस्थानचा या मोसमातील हा पाचवा विजय ठरला.

राजस्थानची बॅटिंग

दरम्यान त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं.  राजस्थानने आरसीबीला विजयासाठी 145 धावांचे आव्हान दिले. राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 144 धावा केल्या. राजस्थानकडून रियान परागने नाबाद 56 धावांची खेळी केली. 

तर कॅप्टन संजू सॅमसनने 27 धावांचं योगदान दिलं. आर अश्विनने 17 रन्स केल्या. डॅरेल मिचेलने 16 धावा जोडल्या. तर आरसीबीकडून मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड आणि वानिंदू हसरंगा या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर प्लेइंग इलेव्हन : फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वानिन्दु हसरंगा, जोश हेजलवुड आणि मोहम्मद सिराज.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोस बटलर, देवदत्त पडिक्कल,  शिमरोन हेटमायर, रियान पराग, डेरिल मिचेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा आणि युजवेंद्र चहल.Source link

Leave a Reply