Headlines

राज ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या “एक आमदार असणाऱ्याकडे १०५ आमदार असणारा…” | NCP Supriya Sule on MNS Raj Thackeray BJP Devendra Fadanvis Meet Shivtirth sgy 87

[ad_1]

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर पोहोचले होते. राज ठाकरेंवर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस भेट घेत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चादेखील झाल्याची शक्यता आहे. दरम्यान या भेटीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. सगळं काही स्वार्थासाठी सुरु असल्याची टीका त्यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांना राज ठाकरे-फडणवीसांच्या भेटीबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या की, “दरारा, प्रतिष्ठा या गोष्टी कर्तृत्व आणि कामातून होतात. कोणी कोणाच्या घरी गेलं याच्यातून होत नाहीत. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी १०५ आमदार असणारा नेता जातो. याचं काय करणार तुम्ही? कोण कसा विचार करतं हे मला माहिती नाही”.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? तर्क-वितर्कांना उधाण!

“महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात जे काही सुरु आहे ते सर्वसामान्यांच्या हितासाठी नाही, फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी सुरु आहे,” अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

राज ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रामुळे चर्चांना उधाण!

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक करणारं पत्र त्यांना पाठवलं होतं. या पत्रामध्ये “पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात टेवण्यासाठी आहे. खरोखरच अभिनंदन”, अशा शब्दांत फडणवीसांचं अभिनंदन केलं होतं. राज ठाकरेंच्या या पत्रानंतर पुन्हा एकदा मनसे-भाजपा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अमित ठाकरेंना मंत्रिपद? राज ठाकरेंनी केलं स्पष्ट

मनसेच्या एकमेव आमदाराची भाजपाला साथ!

तब्बल दीड वर्षांनंतर झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजपाचे सर्व आमदार भाजपा उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या पाठिशी उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेगळी भूमिका घेतलेली असताना मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे नेमके कुणाला मतदान करणार? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र, राजू पाटील यांनी भाजपाच्याच उमेदवाराला आपलं मत दिलं. यामुळे देखील भाजपा-मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं.

राज ठाकरेंवर झाली होती हिप बोन शस्त्रक्रिया!

दरम्यान, गेल्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिपबोन शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं भाजपाच्या गोटातून सांगितलं जात आहे. मात्र. सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबई महानगर पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे या भेटीमध्ये बदलत्या राजकीय समीकरणांवर देखील चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *