Headlines

शरद पवारांनी सांगितलं म्हणून मनसेची स्थापना केली का? राज ठाकरे म्हणाले… | Raj Thackeray comment on Sharad Pawar and MNS party claims pbs 91

[ad_1]

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आधी मोदींचं कौतुक केलं, मग टीका आणि मग परत प्रशंसा केली. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा विषय उचलल्यानंतर यामागे भाजपाचा हात असल्याचा आणि भाजपानेच राज ठाकरेंना सुपारी दिल्याचाही आरोप विरोधकांनी केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं म्हणूनच राज ठाकरेंनी मनसे पक्षाची स्थापना केली, असाही दावा करण्यात आला. या सर्वाच आरोप आणि दाव्यांचा राज ठाकरेंनी समाचार घेतलाय. ते शनिवारी (२३ जुलै) झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “हल्ली या गोष्टी फार सोप्या झाल्या आहेत. मध्यंतरी एकजण पोरकटपणे बोललं की शरद पवारांनी सांगितलं म्हणून राज ठाकरेंनी पक्ष काढला. पवारांनी सांगितलं म्हणून मी माझा पक्ष काढेल का? बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्यासमोर स्वतःचा राजकीय पक्ष काढणं सोपी गोष्ट होती का? आणि तेव्हा माझा आणि शरद पवारांचा काय संबंध होता?”

“कुठल्याही गोष्टी झाल्या की भाजपा किंवा पवारांचा हात असल्याचं म्हणतात”

“आपल्याकडे कुठल्याही गोष्टी झाल्या की बहुदा भाजपाचा हात असावा, बहुदा पवारांचा हात असावा असं म्हणत त्यांचे हात चिकटवले जातात. हे काम त्यांचीच माणसं करतात आणि स्वतःचं महत्त्व वाढवून घेतात. भाजपाने हे करायला सांगितलं असतं तर मग भाजपाने का नाही केलं? एखादा लहान पक्ष पुढे येत असेल तर यामागे यांचा हात असावा, त्यांचा हात असावा असं बोललं जातं,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“पैगंबरांवरील वक्तव्यानंतर सर्वांनी माफी मागायला सुरुवात केली”

“भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी ऐकलेली गोष्ट केवळ उद्धृत केली होती. त्यावर सर्वांनी माफी मागायला सुरुवात केली. नंतर त्यांना पक्षातून काढलं. ओवैसी आमच्या देवदेवतांबद्दल जाहीर भाषणांमध्ये बोलतो त्यावेळी बाकीचे माफी मागतात का? जे देश उठले होते त्या देशांनी आमच्याकडून चूक झाली, असं होणार नाही म्हणत माफी मागितली का? तो माणूस आमच्या हिंदू देवदेवतांबद्दल वाटेल ते बोलला आहे. मी एक दिवस ते दाखवेल,” असाही मुद्दा राज ठाकरेंनी मांडला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *