Headlines

एसटी कर्मचारी संपाबाबत राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या मुंबई तील निवासस्थानी भेट घेतली. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकर मिटावा आणि कामगारांच्या वेतनविषयक मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघावा यासाठी ही भेट होती. सुमारे तासभर झालेल्या चर्चेत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण आणि सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी हे प्रमुख मुद्दे होते.

याप्रसंगी पक्षाचे नेते श्री. बाळा नांदगावकर, श्री. नितीन सरदेसाई, सरचिटणीस श्री. कीर्तिकुमार शिंदे, सचिव श्री. हर्षल देशपांडे, मनसेचे परिवहन कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्री. विलास अकलेकर, सरचिटणीस श्री. मोहन चावरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *