Headlines

रेल रोको आंदोलन , 42 गाड्या प्रभावित

हरियाणा – शेतकऱ्यांच्या रेल रोको आंदोलनाचा प्रभाव दिसू लागला आहे. रेल्वेने सांगितले की दिल्ली विभागातील 42 गाड्यांच्या वर रेलरोको चा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी यूपीमधील मोदीनगर मुजफ्फरनगर येथे रेल्वे अडवली आहे.

हरियाणा राज्यातील बहादूरगड येथे संयुक्त की शान मोर्चाच्या नेत्यांनी रेल्वे अडवल्या आहेत. पंजाब राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रेल रोको आंदोलनाचा परिणाम दिसत आहे. उत्तर रेल्वे चे म्हणणे आहे की आठ रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे. दिल्ली रोहतक आणि दिल्ली अंबाला मार्ग सध्या बंद करण्यात आला आहे. याच कारणामुळे अनेक रेल्वेगाड्या वर त्याचा परिणाम पडला आहे. रेल्वेला काही गाड्या रद्द करावे लागले आहेत.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टीकेत यांनी सांगितले की हे आंदोलन वेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी होईल. पूर्ण देशातील त्या त्या ठिकाणावरील लोकांना माहिती असते की आम्ही ट्रेन अडवल्या आहेत. भारत सरकारने आत्ता सध्या आमच्यासोबत कोणतीही बातचीत केली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *