Rahul Tripathi | राहुल त्रिपाठीचा ‘द कॅच ऑफ द सिजन’, शुबमन हैराण

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 21 वा सामना हैदराबाद विरुद्ध गुजरात यांच्यात खेळवण्यात येतोय. या सामन्यात हैदराबादच्या राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) गुजरातच्या शुबमन गिलचा एकहाची शानदार कॅच घेतला. या कॅचसह राहुलने कॅच ऑफ द सिझनसाठी दावा ठोकला आहे. राहुलने घेतलेल्या या कॅचमुळे शुबमनला 7 धावा करुन मैदानाबाहेर जावं लागलं. (srh vs gt rahul tripathi takes shubaman gill a one handed spectacular catch ipl 2022)

राहुलने भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर हा अफलातून कॅच घेतला. गिलने तिसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्न केला. मात्र गिलने हवेत फटका मारला. त्याच दिशेला राहुल उभा होता. राहुलने कोणतीही चूक न करता हवेत झेपावत भन्नाट कॅच घेतला.  

हैदराबादला 163 धावांचे आव्हान

दरम्यान गुजरातने हैदराबादला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 162 धावा केल्या.

गुजरात प्लेइंग इलेव्हन :  मॅथ्यू वेड (विकेटकीपर), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कॅप्टन), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी आणि दर्शन नालकांडे.

हैदराबाद प्लेइंग इलेव्हन :  अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर), एडेन मार्कराम, शशांक सिंह, वाशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन, उमरान मलिक आणि टी नटराजन. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *