rahul gandhi criticize bjp and rss during bharat jodo yatra in marathwada vidarbhaएकाच देशांमध्ये गुण्यागोविंदाने, राहणाऱ्या जाती-धर्मांमध्ये द्वेष आणि भय निर्माण करणारे तुम्ही कोणत्या देशाचे देशभक्त आहात? असा सवाल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देगलूरमध्ये केला. भारत हा देश बंधुभाव जपणारा व एकतेची भावना जोपासणार असून देशाचे राजकारण करणारे भाजप व आरएसएस बंधुभाव जपणाऱ्या भारताचे देशभक्त असूच शकत नाहीत, असा जोरदार हल्ला त्यांनी चढविला. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या दिवशीच्या पदयात्रेची सांगता भोपळ गाव येथे छोटेखानी सभेने झाली.

हेही वाचा- काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच भाजपाचे गंभीर आरोप; म्हणाले, “अडीच वर्षात भ्रष्टाचारातून…”

देशात द्वेष पसरवण्याचे काम भाजपा व आरएसएसकडून केले जात आहे. जाती-धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहेत. आपल्याच देशातील जाती- धर्मांच्या लोकांमध्ये भांडणे लावणारे भाजपावाले कोणत्या देशाचे देशभक्त आहेत, असा सवाल विचारात हे लोक आपल्या देशाचे तर राष्ट्रभक्त असू शकत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समाचार घेतला.

नोटबंदी आणि जीएसटीवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता दूरदर्शनवर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. त्यावेळी काळया पैशांविरोधातील ही लढाई आहे, असे त्यांनी म्हटले होते. मात्र ते साफ खोटे होते. नोटबंदीने या देशातील, लहान व्यापारी, शेतकरी त्यांनी उद्ध्वस्त केला. जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढविला.

हेही वाचा- “महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून…”, सुप्रिया सुळेंची अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया; ट्विटरवरून केलं आवाहन!

या देशातील तरुण शिक्षण घेत आहेत, परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, हे या देशाचे आजचे वास्तव आहे. नोकऱ्या मिळणारे सरकारी सार्वजनिक उद्योग मोदी बंद करत आहेत. दोन मिनिटांत काही उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते, मग आमचे का होत नाही, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे, असे गांधी म्हणाले.

भारत जोडो यात्रेदरम्यान आज सकाळी मृत्यू पावलेल्या काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांना या सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारत जोडो यात्रेदरम्यान मृत्यू पावलेले काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातर्फे 25 लाखांची मदत करण्यात येणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली.Source link

Leave a Reply