Headlines

‘रफ्तार….’ माहीच्या वेगाला तोड नाही; पाहा रनआऊटचा धडाकेबाज व्हिडीओ

[ad_1]

मुंबई : टॉस जिंकूनही सामना मात्र गमवण्याची वेळ चेन्नईवर आली. रविंद्र जडेजाकडे कर्णधारपद आल्यानंतर एकही सामना जिंकण्यात चेन्नईला यश आलं नाही. चेन्नईने सलग तीन सामने हरून हॅट्रिक केली. या सामन्यात धोनीचा जलवा पाहायला मिळाला. धोनीचं उत्तम कीपिंग आणि फलंदाजी यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला. त्याने केलेल्या रनआऊटच्या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. 

धोनीने उत्तम कीपिंग आणि रनआऊट करूनही चेन्नईला मात्र धावांचं लक्ष्य गाठता आलं नाही. चेन्नई टीम 54 धावांनी सामना हरली. यामध्ये भानुकाला आऊट करताना धोनी रॉकेटच्या वेगानं रनआऊट करताना दिसत आहे. वयाच्या 40 व्या वर्षी धोनीची स्फूर्ती पाहून भलेभले फेल झाले आहेत. 

पंजाब किंग्जच्या डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये चेन्नईचा बॉलर ख्रिस जॉर्डन बॉलिंग करत होता. त्यावेळी भानुका राजपक्षे क्रीझवर होता. भानुकाने शॉट खेळून रन घेण्याचा प्रयत्न केला मात्र धवनने त्याला अर्धावरून परत पाठवलं. त्यावेळी नॉन स्ट्रायकरवर असलेल्या शिखर धवनने शेवटच्या क्षणी धाव पूर्ण न करण्याचा निर्णय घेतला.

भानुका मागे क्रीझवर पोहोचण्यासाठी धावत असतानाच महेंद्रसिंह धोनीनं हवेत उडी मारून बॉल पकडत त्याला रनआऊट केलं. त्याची ऊर्जा आणि स्फूर्ती पाहून सगळेजण थक्क झाले. 

धोनीने चित्त्याच्या वेगानं उडी घेऊन केलेल्या रनआऊटची जबरदस्त चर्चा होत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  वयाच्या 40 व्या वर्षीही धोनीची चपळता बिबट्यापेक्षा कमी नसल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

चेन्नई टीम सलग तिसऱ्यांदा पराभूत झाली आहे. कोलकाता आणि लखनऊने चेन्नईला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं. आता चेन्नईवर पंजाबने 54 धावांनी विजय मिळवला आहे. असं कोणत्याही हंगामात घडलं नाही ते यावेळी घडलं सलग तिसऱ्या आणि लाजिरवाण्या पराभवाचा सामना चेन्नई टीमला करावा लागला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *