Headlines

प्रा. डॉ. ज्योती लक्ष्मण झिरमिरे यांना पुरस्कार जाहीर

उस्मानाबाद – सांगवी (कामेगाव ) येथील कृषिकन्या व सध्या शासकीय पदवयुतर पदवी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय चाकूर जिल्हा लातूर येथे कार्यरत असणाऱ्या प्रा. डॉ. ज्योती लक्ष्मण झिरमिरे (वय २९ वर्ष ) यांना टाटा केमिकल्स सोसायटी ऑफ रूरल डेव्हलपमेंट आणि कस्तुरी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील “कृषी नारी सम्मान-२०२१” पुरस्कार जाहीर झाला.

या पुरस्कारासाठी देशातील ९ राज्यामधून नामांकने प्राप्त झाली होती. डॉ . झिरमिरे यांना “कृषी शिक्षण संस्था प्रतिनिधी ” श्रेणी अंतर्गत हा बहुमान मिळाला आहे. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी माहित करून त्यावर मार्ग काढणारी कृषी शिक्षण संस्था एग्रीकल्चरल डॉक्टोरेट्स असोसिएशन , महाराष्ट्र राज्य च्या त्या पहिल्या महिला प्रतिनिधी आहेत, या अनुषंगाने कस्तुरीच्या राष्ट्रीय प्रमुख डॉ. मुग्धा शहा व कृषिविकासचे सीईओ अमित नाफडे यांनी हा पुरस्कार जाहीर केला. महाराष्ट्रातील चारही कृषीविद्यापीठातुन डॉ. ज्योती यांच्या राष्ट्रीय पातळीवरील या सन्मानाचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *