Headlines

पीव्हीसी आधार कार्ड साठी नाही रजिस्टर्ड मोबाईल नंबरची गरज, पाहा ही प्रोसेस, सहज होईल काम

[ad_1]

नवी दिल्ली: Online PVC Aadhar :भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) आधार कार्ड जारी करते. हे कार्ड ते भविष्यातील वापरासाठी सेव्ह आणि डाउनलोड करण्यासाठी अनेक पर्याय देखील UIDAI प्रदान करते. यापैकी एक म्हणजे आधार पीव्हीसी कार्ड. पीव्हीसी कार्ड विषयी एक चांगली गोष्ट म्हणजे ते सहज कॅरी करता येते. त्याचप्रमाणे पावसात भिजल्यावर खराब होण्याचे टेन्शन नसते. याशिवाय PVC आधार कार्ड, फोटो आणि लोकसंख्या तपशीलांसह डिजिटल स्वाक्षरी केलेला आधार सुरक्षित QR कोडसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह येतो. यासाठी तुम्हाला नाममात्र रक्कम भरावी लागेल. आधार कार्ड युजर्स uidai.gov.in किंवा Resident.uidai.gov.in वरून ५० रुपयांच्यात ऑनलाइन ऑर्डर करू शकतात.

वाचा: Smartphone Offers: पॉवरफुल फीचर्ससह येणारा Vivo ‘चा’ हा स्मार्टफोन अर्ध्यापेक्षा कमीमध्ये खरेदी करण्याची संधी

आधारचे पीव्हीसी कार्ड स्पीडमेलद्वारे रहिवाशाच्या पत्त्यावर वितरित केले जाते. पण, तुमच्या आधार कार्डसोबत नोंदणीकृत फोन नंबर नसेल तर? काळजी करण्याची गरज नाही. तुमच्याकडे नोंदणीकृत मोबाइल नंबर नसला तरीही तुम्ही आधार कार्ड पीव्हीसी ऑर्डर करू शकता, असे UIDAI म्हणते. तुम्हालाही ते ऑर्डर करायचे असल्यास, नोंदणीकृत फोन नंबरशिवाय आधार पीव्हीसी कार्ड कसे ऑर्डर करायचे ते जाणून घ्या.

वाचा: Mobile Networks: 1G ते 5G पर्यंतचा मोबाइल नेटवर्क आणि टेक्नोलॉजीचा रंजक प्रवास

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवाय आधार पीव्हीसी कार्ड कसे ऑर्डर करावे?

तुमचे आधार PVC Addhar डाउनलोड करण्यासाठी किंवा ऑर्डर करण्यासाठी, तुम्हाला प्रथम या लिंकसह UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल – https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint. आता ‘MY Aadhar ‘ पर्याय निवडा ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ पर्यायावर टॅप करा आणि आता आवश्यक बॉक्समध्ये तुमचा १२ अंकी आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा. तुम्हाला कॅप्चा कोड देखील प्रविष्ट करावा लागेल. आता ‘माझा मोबाइल नंबर नोंदणीकृत नाही’ या पर्यायावर क्लिक करा आणि आता सक्रिय असलेला आणि OTP क्रमांक प्राप्त करू शकणारा पर्यायी मोबाइल नंबर प्रविष्ट करा.

आता ‘Send OTP ‘ पर्यायावर क्लिक करा. OTP क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर, ‘अटी आणि नियम’ चेकबॉक्स तपासा आणि ‘सबमिट’ बटणावर टॅप करा. आता तुम्ही प्रविष्ट केलेले तपशील तपासा आणि तुमचे आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर करण्यासाठी ‘पे’ पर्यायावर टॅप करा. तुम्ही तुमच्या आधारचा प्रिव्हयु देखील करू शकता, परंतु ही सेवा फक्त नोंदणीकृत मोबाइल युजर्ससाठी आहे.

वाचा: Ration Card Online: थेट घरी येईल रेशन कार्ड ,असा करा ऑनलाईन अर्ज, प्रोसेस आहे खूप सोपी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *