Headlines

धक्कादायक! धावत्या ट्रेनधूनच उडी मारावीशी वाटत होती…. मृणाल ठाकूर का पोहोचली या निर्णयावर?

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडनं आजवर अनेक कलाकारांना मोठं केलं. काही कलाकारांना यामध्ये आपल्या कुटुंबीयांच्या प्रसिद्धीची मदत झाली. तर काहींनी कोणचाही वरदहस्त नसताना या झगमगाटामध्ये आपली ओळख तयार केली. असं करणाऱ्यांची यादी तशी मोठी. 

याच यादीतलं एक नाव म्हणजे अभिनेत्री मृणाल ठाकूर. छोट्या पडद्यावरून मृणालने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आणि पाहता पाहता तीसुद्धा यशाची वाट चालू लागली. (Bollywood Mrunal Thakur)

पण, तुम्हाला माहितीये का; यशाच्या वाटेवर असणारी हीच मृणाल एक काळ असा आला जेव्हा जगण्याची इच्छा हरवून बसली होती. तिच्या मनात आयुष्य संपवण्याचे विचारही येऊन गेले. 

एका मुलाखतीत तिनं याचा खुलासा केला. बॅचलर ऑफ मास मीडिया या कोर्सला शिकण्याची परवानगी देण्यासाठी तिनं कशीबशी आई- वडिलांची मनधरणी केली होती. 

पण, यामध्ये तिला फारसं यश मिळालं नाही तेव्हा तिला या निर्णयावर शंका वाटू लागली. मुलीनं डेंटिस्ट करावं अशी मृणालच्या आई-बाबांची इच्छा होती. 

’15 – 20 वर्षांचं वय हे अतिशय़ कठीण असतं. तेव्हाच आपण स्वत:ला शोधत असतो. ज्यांना आपण काय करणार आहोत याचं चित्र स्पष्ट नसतं, अशी मंडळी मग आयुष्य संपवण्याचे विचार करतात. 

मी लोकलने प्रवास करायचे. दरवाजावर उभं अताना अनेकदा माझ्याही मनात तिथून उडी मारण्याचे विचार आले होते’, असं ती म्हणाली. 

आपल्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या असल्याचं तिनं मुलाखतीत सांगितलं.

मी जे करतेय त्याच काही चांगलं करु शकले, तर कुठेही मला वाव नसेल, 23 व्या वर्षी लग्न होई आणि मग मुलं…. मला हे नको हवं होतं… अशी भीती तिनं यावेळी व्यक्त केली. 

विविध कामांसाठी ऑडिशन देत असताना आपण काहीच करु शकत नाही, अशा पराभवाच्या भावनेनं मृणालच्या मनात घर केलं होतं. कोणत्याची व्यक्तीसाठी हीच नकारात्मक भावना घात करणारी ठरते, हेच तिच्या वक्तव्यातून लक्षात आलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *