पंजाबच्या संघात शाहरुख खानची बादशाह स्टाईल एन्ट्री, पाहा व्हिडीओ


मुंबई : आयपीएलचे सामने 2022 चे सामने सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्च रोजी पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. पंजाब संघाची तयारी पूर्ण होत आली आहेत. मैदानाबाहेर आणि मैदानात दोन्हीकडे कंबर कसल्याचं दिसत आहे. 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ पंजाब किंग्सच्या फलंदाजाचा आहे. शाहरुख खानचा हा मजेशीर व्हिडीओ आहे. पंजाब संघाची आयपीएलच्या ट्रॉफीवर नजर आहे. यंदा संपूर्ण संघ नव्याने बांधण्यात आला आहे. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारी टीम म्हणून ओळखली गेली. आता ही लाजीरवाणी ओळख पुसण्याची संधी आहे.

ऑक्शनआधी पंजाबने शिखर धवन आणि कगिसो रबाडाला रिटेन केलं. आता केएल राहुलशिवाय मयंक अग्रवाल पंजाबमध्ये असणार आहे. तर मयंककडे कर्णधारपदाची धुरा दिली. पंजाबच्या एका खेळाडूची जगभरात चर्चा आहे. आधी त्याच्या हटके नावामुळे आता त्याच्या व्हिडीओमुळे ही चर्चा रंगली. 

पंजाब संघात शाहरुख खानचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये शॉट्स खेळताना दिसत आहे. त्याचा फलंदाजी करतानाचा व्हिडीओ पंजाबने शेअर केला. या व्हिडीओला शाहरुख खानचं बॉलिवूडमधील बादशाह हे गाणं लावलं आहे. शाहरुख खाननं बादशाह स्टाईलनं केलेली एन्ट्री सर्वांनाच आवडली. 

ह्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये बादशाह ओ बादशाह असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. किंग खान शाहरुख सारखं या क्रिकेटपटूचं शाहरुख खान नाव आहे. तर दुसरं म्हणजे गेल्यावर्षी तो कोलकाता संघाचा ओपनिंग फलंदाज होता. मात्र यंदा पंजाबमधून खेळताना दिसत आहे.

बादशाह ओ बादशाह या गाण्यावर शाहरुख खानने हटके एन्ट्री केली असून त्याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. पंजाब संघातील शाहरुख खानच्या कामगिरीकडे यंदा लक्ष असणार आहे. Source link

Leave a Reply