Headlines

पुढील आठवड्यात सुरू होताहेत २ जबरदस्त सेल,पण खरेदी आणि पेमेंट करताना याकडेही लक्ष द्या

[ad_1]

नवी दिल्ली: Shopping Tips:पुढील आठवड्यापासून Flipkart आणि Amazon प्लॅटफॉर्मवर सेल सुरू होणार आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोन, लॅपटॉप, TWS आणि इतर अनेक उत्पादने खरेदी करता येणार असून या काळात, चांगल्या सवलती, ऑफर आणि कॅशबॅक इत्यादी बहुतेक उत्पादनांवर सूचीबद्ध केले जातील. या काळात अनेकजण चांगल्या बचतीमुळे उत्पादन विकत घेतात. परंतु, तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे का की, तुम्ही जे प्रोडक्ट फक्त डील पाहून खरेदी करता ते खरोखरच नवीन आहे का ? जर नाही, तर ही माहिती तुमच्या कामी येईल. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सेलमध्ये मिळणाऱ्या उत्पादनांची खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याबद्दल जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हाला खरेदी करताना कन्फ्युजन होणार नाही.

वाचा: Smartphone Offers: दिवाळी सेलची वाट का पाहता ? फ्लिपकार्टवर ५३९ रुपयांत मिळतोय ९,९९९ रुपये किमतीचा ‘हा’ फोन

प्रोडक्ट किती जुने आहे?

स्मार्टफोन, मोबाइल, लॅपटॉप आणि कोणतेही उपकरण खरेदी करण्यापूर्वी ते कधी लाँच झाले आहे ते तपासा. नवीन उत्पादनामध्ये नवीन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वापरले जातात. परंतु अनेक कंपन्या जुन्या डिव्हाईसवर अधिक सूट देऊन युजर्सना आकर्षित करतात. म्हणूनच कोणतेही उत्पादन घेण्यापूर्वी त्याची माहिती घेणे आवश्यक आहे.

वाचा: Mobile Internet: कामाच्या वेळी मोबाइल डेटा संपला? डायल ‘हा’ नंबर, लगेच मिळेल डेटा, पाहा ट्रिक

इतर इंटरनेट वेबसाइट्सवर किंमत तपासा:

सेलमध्ये उपलब्ध स्मार्टफोन, TWS आणि लॅपटॉप इत्यादींवर उपलब्ध असलेल्या सवलतींबद्दल आनंदी होण्याऐवजी, त्या सवलतीची जुनी किंमत तपासा. आता त्यानंतर त्या प्रोडक्टच्या लॉंचिंगच्या वेळी किती किंमत होती ते सुद्धा पाहा. जे तुम्ही इंटरनेटवर जाऊन सहज तपासू शकता.

खरेदी करणे आवश्यक आहे का:

कोणतेही प्रोडक्ट किंवा सामान केवळ सूट मिळत आहे म्हणून खरेदी करू नका. तर, तुम्हाला त्या उत्पादनाची खरोखर गरज आहे का ते पहा. कोणतेही उत्पादन घेण्यापूर्वी त्याचे महत्त्व तपासा.

वाचा: SAR Value: आरोग्यासाठी किती घातक आहे तुमचा मोबाईल, ‘या’ कोडच्या मदतीने करा माहित, पाहा स्टेप्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *