Headlines

लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय तर्फे नान्नज येथे पथनाट्याद्वारे जनजागृती

पथनाट्य सादरीकरण करताना लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयाचे विद्यार्थी


सोलापूर/ एबीएस न्युज नेटवर्क – पुण्यश्लोक
आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्नित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय व उपप्रादेशिक कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नान्नज येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी गावचे सरपंच हनुमंत टोणपे उपसरपंच संभाजी दडे विभाग प्रमुख डॉ. किरण जगताप, मोटार वाहन निरीक्षक श्री किरण खंदारे ग्रामपंचायत सदस्य शिरीष मम्हाने,मंजूर शेख, पत्रकार पिंटू विभुते, प्रा शुभम चवरे समाधान कदम, सुनील गायकवाड, गोकुळ यादव आदी उपस्थित होते .


नान्नज येथे राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी पथनाट्याद्वारे जनजागृती करत असताना विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा, हेल्मेट सक्ती, वाहन परवाना, सिग्नल चा वापर, वाहन चालवताना त्याचे नियम, या विविध विषयावरती पथनाट्याद्वारे सादरीकरण केले . याप्रसंगी गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. किरण जगताप यांनी केले तसेच संभाजी धडे व वाहन निरीक्षक श्री किरण खंदारे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातून बार्शी सोलापूर हा रस्ता नवीन झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढलेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोकुळ यादव व आभार मंजूर शेख यांनी केले.

Leave a Reply