Protests by women journalists in Kolhapur against Bhide Gurujiआधी टिकली लाव मग प्रश्नाचे उत्तर देतो, असे वक्तव्य केल्याबद्दल संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात कोल्हापुरातील महिला पत्रकारांनी शनिवारी निदर्शने केली.दसरा चौक येथे आंदोलनावेळी टिकली लावणे हा प्रत्येक महिलेची वैयक्तिक गोष्ट आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी महिलांची माफी मागून विधान मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा- चंद्रकांत खैरे यांनी विधान मागे घ्यावे – सतेज पाटील

भिडे गुरुजींचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. क्रांतीसिहच्या संपादिका सुनंदा मोरे, श्रद्धा जोगळेकर,शुभांगी तावरे, अश्विनी खोंद्रे, सीमा पवार, दीक्षा घोरपडे, अर्पणा माने, कल्याणी अमनगी, अर्चना बनगे, क्षनिक्षा धनवडे आदी उपस्थित होत्या.

हेही वाचा- “बाळासाहेबांच्या स्मारकात तोतयागिरी करणारे…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

काय म्हणाले होते भिडे गुरुजी

संभाजी भिडे यांचं एक वादग्रस्त वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. एका महिला पत्रकाराला केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे हे पुन्हा वादात सापडले आहेत. संभाजी भिडे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात आले होते. तेव्हा महिला पत्रकाराने संभाजी भिडेंना प्रश्न विचारला असता भिडे गुरुजी म्हणाले ‘आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.Source link

Leave a Reply