Headlines

Protest of MPSC students suspended in Pune msr 87 svk 88

[ad_1]

महाराष्ट्र राज्य सेवेची सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्याच्या मागणीसाठी आज पुण्यातील अहिल्यादेवी शिक्षण मंडळ समोर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आंदोलन करणार होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसानी कडक बंदोबस्त ठेवला. पण त्यापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत आंदोलन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा आदेश काढण्यात आला. त्यानंतर विद्यार्थिनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

… त्यामुळे विद्यार्थीवर्गावर दडपण आले आहे –

यावेळी आंदोलनस्थळी जमलेल्या विद्यार्थ्यां सोबत संवाद साधला असता ते म्हणाले की, “सीसीआर पेपर २ या करिता आम्हाला वेळ दिला जावा. तसेच महाराष्ट्र राज्य सेवेची सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यास क्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्यात यावी. या विद्यार्थ्यांच्या रास्त मागणी होत्या. त्यासाठी विद्यार्थी आंदोलन करणार होते. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस विभागामार्फत आम्ही जर आंदोलन केले. तर कारवाई केली जाईल असे आदेश काढण्यात आले. त्यामुळे विद्यार्थीवर्गावर दडपण आले आहे. यामुळे आजचे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.”

नागपूर : ‘एमपीएससी’कडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी?, विद्यार्थी आक्रमक

वर्णनात्मक पद्धत आणि यूपीएससीच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम –

राज्यसेवा परीक्षेमध्ये बदल करून वर्णनात्मक पद्धत आणि यूपीएससीच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम आणण्याचे एमपीएससीने जाहीर केले. हा बदल २०२३पासून लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठीचा नवा अभ्यासक्रमही नुकताच जाहीर करण्यात आला. उमेदवारांकडून परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम बदलाचे स्वागतही करण्यात आले. मात्र या बदलांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने या निर्णयाची अंमलबजावणी २०२५पासून करण्याची मागणी करण्यात येत आहे.

आयोगाने कालच ट्वीटद्वारे दिला होता इशारा –

या पार्श्वभूमीवर एमपीएससीने कालच “ राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमासंदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांडून आंदोलन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून अशा घटकांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशा बाबी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाई करण्यात येईल.” असा ट्वीटद्वारे स्पष्ट इशारा दिला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *