Headlines

सात वर्षीय मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ मावळमध्ये उत्स्फुर्त बंद, नागरीकांचा निषेध मोर्चा | protest against the murder of a seven year old girl a protest march was held in Maval kjp 91

[ad_1]

मावळच्या कोथुर्णी इथे घरासमोर खेळत असतांना सात वर्षाची मुलगी मंगळवारी बेपत्ता झाली होती. तिचा बुधवारी मृतदेह आढळल होता. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय-२४) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी विरोधात खून, अपहरण आणि लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी कामशेत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत मावळ मधील नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. उत्स्फुर्तपणे शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तेजस हा अविवाहित असून तो पवना नगर परिसरातील एका बंगल्यावर केअर टेकर म्हणून काम करतो आहे. त्याला मंगळवारी सुट्टी होती. मद्यपान केलेल्या तेजसने सात वर्षाच्या मुलीचे घरासमोरूनच अपहरण केलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि मग तिचा खून केला आहे. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबाबरोबर अवघं गाव तिचा शोध घेत होतं. उशिरा पर्यंत शोध न लागल्याने याबाबत कामशेत पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तिथून जाणाऱ्या गाड्यांबाबत देखील चौकशी करण्यात आली.

दरम्यान बुधवारी रोजी शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या गवतात मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या तपासाची चक्रे आणखी वेगाने फिरली, घटनास्थळाच्या परिसरात तेव्हा काही तरुण असल्याचं समोर आलं. त्यातून आरोपी तेजसचं नाव पुढे आलं. कामशेत पोलिसांनी तेजसला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी करत नागरीकांनी मोर्चा काढला. मावळमधील शाळा, महाविद्यालये, बाजापेठ आज सकाळी बंद ठेवण्यात आली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *