नाईट क्लबमध्ये महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रियंकाचा केला पाठलाग आणि पुढे जे झालं…


मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) सध्या ‘कॉफी विथ करण 7’ (Koffee With Karan 7) या त्याच्या चॅट शोमुळे चर्चेत आहे. कॉफी विथ करणच्या प्रत्येक सीझनमध्ये काही कलाकार हजेरी लावताना दिसतात. यामध्ये देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) देखील आहे. यंदाच्या सीझनमध्ये अजून प्रियांका दिसली नाही. तरी देखील प्रियांका चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच तिचा एक थ्रोबॅक एपिसोड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वेळी प्रियांकानं कबूल केलं होतं की, तिला एकदा एका महिलेनं प्रपोज केलं होतं. एका मुलीनं प्रपोज केल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रियांकानं कमिटेड असल्याचं खोटं सांगितलं. 

प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केलं आणि त्यानंतर ती परदेशात स्थायिक झाली. प्रियांका चोप्रा 3 वर्षांनी भारतात आली. अभिनेत्री करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये पोहोचली होती जिथे तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्यं उघड केली होती.

यावेळी बोलताना प्रियंका चोप्राने सांगितलं होतं की, एकदा तिला एका लेस्बियनने थांबवलं ​​होतं. ती पुढे म्हणाली की, लेस्बियन असणं चुकीची गोष्ट नाही. यावेळी मला नक्की काय करावं हेच समजत नव्हतं.
    
प्रियांका चोप्राची एका नाईट क्लबमध्ये लेस्बियनशी भेट झाली
एकदा प्रियांका चोप्रा एका नाईट क्लबमध्ये गेली होती तेव्हा तिला एक मुलगी भेटली ती त्या मुलीला आधीपासूनच ओळखत होती. ती दिसायला सुंदर होती. जेव्हा ती तिला भेटली तेव्हा ती प्रियंका चोप्राला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली, प्रियांकाला काय करावं हे समजतच नव्हतं.

प्रियांकाने एका लेस्बियन मुलीशी असं केलं डिल
जेव्हा महिलेने प्रियंकाला त्रास देण्यास सुरुवात केली, तेव्हा प्रियंका चोप्राला खोटं सांगावं लागलं की, तिचा बॉयफ्रेंड आहे आणि ती मुलांकडे लक्ष देते. त्यावेळी प्रियांकाला कोणताही बॉयफ्रेंड नव्हता. त्या क्षणी तिची सुटका व्हावी म्हणून ती असं बोलत होती.

प्रियांकाने 2000 साली मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.
प्रियांका चोप्राने 2000 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली, जरी प्रियांकासाठी बॉलिवूडमध्ये काम करणं खूप कठीण होतं. तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. जेव्हा ती चित्रपट करायला गेली तेव्हा तिला स्तनाचा आकार वाढवण्याचा किंवा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. प्रियांकाने तिच्या अनफिनिश्ड या आत्मचरित्रात या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे.Source link

Leave a Reply