प्रियांकाच्या घरी एक नव्हे, 4 मुली; ऐकणारेही हैराण


मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती, अमेरिकन गायक निक जोनास यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या या नात्यात एका चिमुकलीचं स्वागत केलं. सरोगसीच्या माध्यमातून निक आणि प्रियांकानं एका मुलीचं पालकत्त्वं स्वीकारलं. (Priyanka chopra nick jonas daughter)

मालती मेरी चोप्रा जोनास, असं नाव देत त्यांनी या मुलीला नवी ओळख दिली. जानेवारी महिन्यात जन्मलेल्या मालतीला हल्लीच प्रियांकानं घरी आणलं. प्रसूतपूर्व काळाच्या आधीत जन्म झाल्यामुळं ती इतके दिवस NICU मध्ये होती. 

जिथे प्रियांका तिच्या या लेकिबद्दल सतत व्यक्त होताना दिसली, तोच तिथे आता निकही आपल्या मुलीबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. एका कार्यक्रमादरम्यान, मुलीच्या जन्मानंतर नेमकं काय बदललं असं विचारलं असता, आयुष्य खूप सुंदर आहे अशा शब्दांत त्यानं उत्तर दिलं. 

लेकिला एक अनमोल भेट म्हणून संबोधत, तिच्या जन्मामुळं जोनास कुटुंबही आणखी वाढल्याचं तो म्हणाला. निकच्या संपूर्ण कुटुंबात फक्त मुलीच आहेत. हा मुद्दाही त्यानं अधोरेखित केला. 

‘माझे आईबाबा फार उत्सुक आहेत. कारण, आता ते 4 मुलींचे आजी आजोबा आहेत’, असंही तो म्हणाला. निकचा भाऊ केविन याला 2 मुली आहेत. तर, जो जोनास आणि सोफी टर्नर यांनाही एक मुलगी आहे. ही जोडी लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे. 

थोडक्यात काय, तर आता जोनास कुटुंबाची नवी पिढी त्यांच्या या कुटुंबाचं गोकुळ करतेय असं म्हणायला हरकत नाही. Source link

Leave a Reply