सोलापूर येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ भरती मेळावा

सोलापूर :आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ अंतर्गत प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ भरती मेळाव्या (PMNAM) चे आयोजन केलेले आहे. दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर येथे मेळावा होणार असल्याचे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर यांनी कळविले आहे.

सोलापूर जिल्हयातील सर्व आस्थापना व आयटीआय उत्तीर्ण व अंतीम वर्ष परीक्षा दिलेले सर्व प्रशिक्षणार्थी मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. तसेच ज्या आस्थापनामध्ये अध्याप शिकाऊ उमेदवारी योजना लागू केलेली नाही तसेच ज्या आस्थापनांना शिकाऊ उमेदवार भरती करावयाची आहे. अशा सर्व आस्थापनेतील प्रतिनिधिंनी अॅप्रेन्टीस ट्रेनिंग विभागास संपर्क साधावा असे, आवाहनही प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी केलेले आहे.

Leave a Reply