Headlines

President Election: नवनीत राणा म्हणतात, “आम्ही शरद पवारांना मानणारे लोक…”; हात जोडून केली ‘ही’ विनंती | mp navneet rana urges sharad pawar to support draupadi murmu for presidential election

[ad_1]

राष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर आलेली असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष पुरस्कृत उमेदवार देशातील वेगवेगळ्या भागाचे दौरे करत असून स्थानिक पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहेत. राज्यात शिवसेनेने भाजपा पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. असे असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शरद पवार यांना विशेष विनंती केली आहे. शरद पवार यांनी द्रौपदी मुर्मू यांना समर्थन द्यावे, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

हेही वाचा >>> Petrol Diesel Price : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल प्रतिलिटर ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

“आदिवासी समाजातील महिलेला कधीही संधी मिळालेली नाही. आदिवासी समाजाच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, हा संदेश दिला पाहिजे. आम्ही सगळे शरद पवार यांना मानणारे आहोत. त्यांना फॉलो करणारे लोक आहोत. म्हणून शरद पवार यांनी द्रौपदी मुर्मू यांना समर्थन द्यावे, अशी विनंती करते,” असे नवनीत राणा शरद पवार यांना उद्देशून म्हणाल्या आहेत. याबाबतचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंना मानता, तर मग त्यांना सोडून का आलात?” निलेश राणेंचा दीपक केसरकरांना सवाल, ‘विश्वप्रवक्ते’ म्हणत लगावला टोला!

महाविकास आघाडीचा घटकपक्ष असूनदेखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. यावरही नवनीत राणा यांनी आपले मत व्यक्त केले आहे. “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एका आदिवासी महिलेला उमेदवारी देण्यात आली आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. या समाजाला न्याय देण्यासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मू कठीण परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आज त्या महाराष्ट्रात येणार आहेत. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा दिला. १२ ते १३ खासदारांनी दबाव टाकून उद्धव ठाकरेंचे मन वळवले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते,” असेदेखील नवनीत राणा म्हणाल्या.

हेही वाचा >>> ‘बिग बॉस १६’साठी सलमान खान किती मानधन घेणार? रक्कम ऐकून व्हाल थक्क

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीच्या एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांनीदेखील मुर्मू यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे त्या ठाकरेंची भेट घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *